आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण:कोरेगाव भीमाच्या गुन्ह्यातून संभाजी भिडे यांना वगळले

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील गुन्ह्यातील तपासादरम्यान शिवप्रतिष्ठान संस्थेचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे मिळून न आल्याने त्यांना गुन्ह्यातून वगळण्यात आल्याची माहिती, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य मानव हक्क आयोगास लेखी पत्राद्वारे दिली आहे. मुंबईतील मानव हक्क आयोगाबाबत काम करणारे वकील आदित्य मिश्रा (रा.ठाणे) यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात सन २०१८ मध्ये दाखल गुन्ह्याचे तपासात प्रगती नसल्याबाबत राज्य मानव हक्क आयोग, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...