आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:कोयत्याच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले, 80 हजारांची रोकड चोरली

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बेकरीत बसलेल्या व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्याकडील ८० हजारांची रोकड आणि ३ मोबाइल असा ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १ नोव्हेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगर परिसरात असलेल्या न्यू मार्शल बेकरीत घडली. जहिरुद्दीन अन्सारी (४९, रा. कोंढवा, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. माहितीनुसार, अन्सारी यांची संतोषनगर परिसरात बेकरी आहे. १ नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास ते दुकानात बसले होते. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी अन्सारी यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटले.

बातम्या आणखी आहेत...