आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्तरांची सावली आज वयाच्या 95 व्या वर्षी हरपली:​​​​​​​कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचे आज पहाटे 4 वाजता नेरळ येथे निधन

पुणे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंत्ययात्रा नेरळ येथून सकाळी 11वाजता निघेल.

मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे 4 वाजेदरम्यान त्यांचे नेरळ येथे दु:खद निधन झाले. त्यांची अत्यंयात्रा नेरळ येथून सकाळी 11 वाजता निघेल.

कृष्णाबाई तळेकर यांचा जन्म गिरणगावमध्ये झाला होता. त्या वर्षसव्वावर्षाच्या असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले होते. काही महिन्यांनंतर त्यांच्या आईनेही आत्महत्या केली. परळच्या मंगलदास चाळीत आजीने कृष्णाबाईंना वाढवले. घरी प्रचंड गरिबी. चारही काका व्यसनाधीन वयाच्या आठव्या वर्षापासून धुणंभांडी, मजुरी करून कृष्णाबाई आजीला मदत करत करायच्या.

बातम्या आणखी आहेत...