आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारसीकांच्या मनावर गायनाच्या शैलीचे गारूड निर्माण करणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यात मैफील रंगली. पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद येथे कला क्रीडा केंद्राचे अध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. डॉ. मोहनकुमार दरेकर, पं. राजेंद्र कंदलगांवकर, मीनाताई फातर्पेकर, आयोजक मोहन जोशी उपस्थित होते.
उल्हास पवार म्हणाले, पं. कुमार गंधर्व यांच्या शास्त्रीय संगीताची परंपरा वैशिष्ट्यपूर्ण होती. आजही त्यांच्या गायनाच्या शैलींचे गारुड देशभर आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांच्या गायनाच्या शैलीचा गौरव केला होता. यापेक्षा मोठा गौरव होणे नाही. स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी मध्यप्रदेशातील धार येथे पं. कुमार गंधर्वांची आर्वजून भेट घेतली होती. या भेटीत पं. कुमार गंधर्व यांचे शास्त्रीय गायन त्यांनी आवर्जून ऐकले.
ईश्वराचे दर्शन वारंवार होत नाही
पं. डॉ. मोहनकुमार दरेकर म्हणाले, सवाई गंधर्वातील एका कार्यक्रमात पं. कुमार गंधर्व यांना भेटता आले. ईश्वराचे दर्शन वारंवार होत नाही, तर एकदाच होते. असेच पं. कुमार गंधर्व यांच्या गाण्यात होते. त्यांच्या गाण्यांचे पारायण सुरु असून पुढील पिढीला ते नक्कीच दिशा देणारे असेल असेही पं. कुमार गंधर्व यांनी आपल्या गायनातून बोली भाषेत उच्चाराला फार महत्व दिले. त्यांच्या गायनाची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. अवघ्या सहा वर्षाचा मुलगा रेकॉर्डींग ऐकून जसेच्यातसे ऐकलेले राग गाण्याची हातोटी त्यांच्या अंगी होती.
कलाविष्कारांचा अभ्यास गरजेचा
पंडित राजेंद्र कंदलगांवकर म्हणाले, पं. कुमार गंधर्व यांच्यात स्वरांची सिद्धी होती. त्यांनी गायलेल्या स्वरांची आस दीर्घकाळ असायची. प्रत्येक गायनात त्यांच्या स्वरवाक्य दिसून येत होते. त्यांच्या गायनाचा अभ्यास आपल्याला कसा करता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्या कलाविष्कारांचा अभ्यास करुन नव्या पिढीला देण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.