आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही नाराज नव्हतोच:कसबात भाजपची मते का फिरली गेली याचे चिंतन करावे लागेल - कुणाल टिळक

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचा कसबा हा अनेक वर्षपासून बालेकिल्ला असताना, यंदाच्या निवडणुकीत भाजपची हक्काची मते नेहमीच्या प्रभागातून इतरत्र का फिरली गेली याचा अभ्यास, चिंतन करावे लागणार आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे प्राबल्य निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांसह मला आगामी काळात अधिक काम करावे लागणार असल्याची भावना आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र भाजप प्रवक्ते कुणाल टिळक यांनी गुरुवारी व्यक्त केली आहे.

कसबा हातून जाणे दुःखदायक

कुणाल टिळक म्हणाले, कसबा मतदारसंघात अनेक वर्ष आमदारपदावर राहिलेल्या गिरीष बापट यांचे शिकवणी प्रमाणे मतदारसंघात पक्षाशी संबंधित मतदारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी दीर्घकाळ लागत असताे. त्यामुळे भाजपच्या हातून कसबा मतदारसंघ जाणे ही बाब आमच्यासाठी दुख:दायक आहे. कारण मतदारसंघ गेल्यानंतर नागरिकांचे मतपरिवर्तन करण्यासाठी पुढील काळात अधिक वेळ लागणार आहे. प्रभाग क्रमांक १५ हा अनेक वर्ष भाजपचा हक्काचा मतदार परिसर हाेता. परंतु यंदा त्याठिकाणी काँग्रेसचा मतदार यावेळी टिकून राहिल्याने भाजपला फटका बसलेला आहे.

दुसरा उमेदवार दिल्याने नाराजी नव्हती

कुणाल टिळक म्हणाले, भाजपने टिळक कुटुंबीयास उमेदवारी न देता दुसऱ्या उमेदवारास उमेदवारी दिल्याने आमची नाराजी नव्हती. भाजपचे वरिष्ठ नेते ज्याप्रमाणे निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही काम करत राहू. त्यानुसरच हेमंत रासने यांच्या पाठीशी आम्ही उभे राहून प्रचारात सक्रिय काम केले. रासने हे स्थानिक प्रमागातील नगरसेवक असून स्थायी समितीचे अध्यक्ष हाेते. त्यामुळे मतदारसंघात कशाप्रकारची नाराजी हाेती, जाे आम्ही पक्षाचा संदेश नागरिकांपर्यंत पाेहचवत हाेताे ताे पुरेसा याेग्यप्रकारे पाेहचला नाही का? याबाबत आगामी काळात अभ्यास करुन निवडणुकीची रणनिती आखावी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही

कुणाल टिळक म्हणाले, या पाेटनिवडणुकीचा आगामी पुणे मनपा निवडणुक, विधानसभा निवडणुकीत परिणाम हाेणार नाही. कारण या निवडणुकीचे विषय वेगळया स्वरुपाचे हाेते. उमेदवाराचा प्रभाव बाबत मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमदेवार थाेडे आघाडीवर हाेते. परंतु त्यांना 11 हजारांचे मताधिक्य कशामुळे मिळाले याबाबतची कारणे तपासणी गरजेचे आहे. काेणत्या ठिकाणी आम्ही संघटनात्मक दृष्टया कमी पडताे याची पाहणी करावी लागणार आहे. ब्राम्हण समाज, संघटना यांचा भाजप उमेदवार रासने यांना जाहीर पाठिंबा हाेता त्यामुळे त्यांची नाराजी हाेती हे म्हणणे याेग्य नाही.

बातम्या आणखी आहेत...