आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश:मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू होती देहविक्री; मुंबईच्या मॉडेलसह 6 जणींची सुटका

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंध परिसरातील उच्चभ्रू परिसरात द व्हाइट विलो स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश सामाजिक सुरक्षा विभागाने केला. यावेळी आसाम येथील एकाला बेड्या ठोकत मुंबईतील एका मॉडेलसह आसाम, मनिपूर येथील मिळून सहा महिलांची सुटका सामाजिक सुरक्षा विभागाने केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी (ता. 16) दिली आहे.

मालकाला बेड्या

याप्रकरणी व्हाइट विलो स्पाचा सहायक व्यवस्थापक सुफियान जमालुद्दिन अहमद (23, रा. रिध्दी कॉम्प्लेक्स, औंध,पुणे) याला अटक करण्यात आली आहे. स्पा मालक वेंकटेश टिपू राठोड (38, रा., लोहगाव रोड, इंदिरानगर,पुणे), स्पा व्यवस्थापक देवीसिंग उर्फ लीलाधर शंकरसिंग चव्हाण (30, रा. जयप्रकाश नगर,लोहगाव,पुणे), गोविंदकुमार सदनिकेचा मालक अभिनव रामनाथ वाजपेयी (रा.औंध, पुणे) आणि मोना रामनाथ वाजपेयी यांच्यावर देखील गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे स्वीकारले अन्...

चतुश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ’द व्हाइट विलो स्पा’, फ्लॅट नंबर 303, रिद्धी कॉम्प्लेक्स, माधुरी पार्क को-ऑप हौसिंग सोसायटी, कोटबागी हॉस्पिटल जवळ, औंध येथे मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला 15 जून रोजी मिळाली होती. त्यानुसार छापा टाकताना बनावट ग्राहक पाठविण्यात आला. ग्राहकाने एक्स्ट्रा सर्व्हिससाठी गुगल पे ने पैसे दिल्यावर व ते स्वीकारल्यावर, त्याने पोलीस पथकाला इशारा केला.

पळण्याचा प्रयत्न फसला

काउंटरवर बसलेल्या सुफियानने सीसीटिव्हीत पोलिसांना येताना पाहिले. त्याने तात्काळ स्पाचा दरवाजा आतून बंद करून, आतील खोलीत पळाला. सदरचा दरवाजा डमी कस्टमरच्या मदतीने उघडला. पण तो पर्यंत सुफीयान याने पळून जाण्यासाठी दोन महिलांसह फ्लॅटचे खिडकीतून एसीच्या डक्टमध्ये प्रवेश केला. तेथून वरचा मजला गाठून, स्पा चे वरच्या मजल्यावरील खिडकीतून रीसर्च इन्फोटेक सेंटरचे आत प्रवेश केला. तेथून पळून जात असताना रिसर्च इन्फोटेक सेंटरच्या कामगारांच्या मदतीने सामाजिक सुरक्षा विभागाने त्यांना पकडले.

महिलांना कोंडले

पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेला विचारणा केली. तेव्हा तिने स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांना शेजारचे पूजा बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर फ्लॅट क्र. 601 मध्ये कोंडून ठेवले असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिस पथकाने तेथे जाऊन पीडित महिलांचा शोध घेऊन त्यांची सुखरूप सुटका केली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणीक यांच्या पथकाने ही कारवाई करताना पीडित मुलीची सुटका केली.

बातम्या आणखी आहेत...