आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:‘बालभारती’च्या पुस्तकामध्ये सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन यांचा उल्लेख

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षम्य चूक केल्याचा ब्राह्मण महासंघाचा आराेप

स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करले हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. पण, बालभारती आठवीच्या भाषेच्या पुस्तकातील एका संवादात भगतसिंग, राजगुरू यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकाच्या नावात सुखदेव यांच्या जागी कुर्बान हुसेन यांचा उल्लेख आहे. बालभारतीने ही अक्षम्य चूक केल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी केला आहे. दुसरीकडे, बालभारतीचे जनसंपर्क अधिकारी किरण केंद्रे म्हणाले, स्वातंत्र्यसैनिक व लेखक यदुनाथ थत्ते यांचे ‘प्रतिज्ञा’ या पुस्तकातील हे फिक्शन आहे. त्यांचा लेखातील संवाद आहे तसा पुस्तकात घेतला असून बदल करण्याचा अधिकार आम्हाला नाही. दवे म्हणाले, कुर्बान हुसेन सोलापूरचे क्रांतिकारक होते. त्यांना भगतसिंग यांच्या ४ महिने आधीच सोलापुरात फाशी दिली होती. परंतु भगतसिंग, राजगुरू यांच्यासोबत सुखदेवऐवजी त्यांचे नाव कसे आले याचा खुलासा बालभारतीने केला पाहिजे.

सोलापूरचे कुर्बान हुसेन, वयाच्या २२ व्या वर्षी फासावर गेले

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर दिले. त्या वेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत असे सांगण्यात येते. सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले. त्यांनी १९२७ मध्ये ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरू केले होते.