आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजुराचा मृत्यू:चौदाव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू, सुपरवायझर आणि सेफ्टी ऑफिसर यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रोडवरील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून खाली पडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी (दि. ३० नोव्हेंबर) ही घटना घडली असून पोलिसांनी ठेकेदार व चौघांवर गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती शुक्रवारी दिली आहे.

श्याम नेमा रविदास (२२ ) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार लज्जाराम गुजर तसेच या सुपरवायझर रामकिसन गुजर आणि सेफ्टी ऑफिसर रवी गवंडे व अजिंक्य यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बाणेर भागातील पॅनकार्ड रोडवर कल्पतरू नावाच्या बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या कामाचा ठेका लज्जाराम तसेच इतरांनी घेतलेला आहे. बांधकाम साइटवर श्याम हा फरशी बसवण्याचे काम करत होता. दोन दिवसांपूर्वी चौदाव्या मजल्यावरील ओपन बाल्कनीत श्याम हा फरशी बसवण्याचे काम करत असताना तो अचानक खाली कोसळला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...