आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Lampi Skin Maharashtra | Bailgada Race Compatation Maharashtra | Decision Regarding Bullock Cart Races After Reviewing The Local Conditions; Directions Of Radhakrishna Vikhe

राज्यात लम्पीची दहशत:बैलगाडा शर्यतींबाबत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी चर्मरोगाची संबंधित जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर बैलगाडा शर्यतींच्या आयोजनात शिथिलता देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

मंत्री विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैलगाडा शर्यतींच्या अनुषंगाने बैलगाडा मालक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत विधानभवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विखे- पाटील बोलत होते. बैठकीस आमदार महेश लांडगे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह तसेच बैलगाडा मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शासन नेहमी पाठिशी

बैलगाडा शर्यती सुरू राहाव्यात ही शासनाची भूमिका असून त्यासाठी शासन खंबीरपणे आपली भूमिका बजावेल. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीसाठी बाजू मांडण्यासाठी नेमण्यात आलेल्या वरिष्ठ विधिज्ञांना आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, असेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.यावेळी आमदार लांडगे तसेच बैलगाडा मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी पशुसंवर्धन विभागाने लम्पी चर्मरोग उपाययोजनेसाठी गतीने लसीकरण हाती घेतल्यामुळे लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

शासनाचे संपूर्ण सहकार्य

महानंद डेअरीला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्यासाठी डेअरीनेही बाजाराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले. महाराष्ट्र राज्य दूध महासंघाच्या (महानंद) समस्यांच्या अनुषंगाने विधानभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

तातडीने उपाययोजना गरजेचे

विखे-पाटील म्हणाले, जिल्हा, तालुका संघांची ही मातृसंस्था सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च मोठा आहे. त्यामुळे महानंदने खर्चात कपात करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. ही संस्था टिकली पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. त्यादृष्टीने काही कालावधीसाठी ही संस्था व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे (एनडीडीबी) देण्याबाबत विचार सुरू आहे. तोपर्यंत संस्थेला दरमहा होत असलेला तोटा कसा कमी करता येईल यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

बाजारपेठेत उतरुन प्रयत्न

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाची रक्कम नियमित देणे याला प्राधान्य असले पाहिजे. संस्थेच्या सभासद संघांना देणे असलेली रक्कम देता यावी यासाठी शासनाकडून 10 कोटी रुपये महानंदला तात्काळ दिले जातील. एकेकाळी नऊ लाख लिटरच्या वर असणार दूध संकलन पन्नास हजार लिटरच्या घरात आले असून त्यामुळे संघाचा तोटा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे महानंदने दूध संकलन वाढीसाठी बाजारातून दूध खरेदी करण्याच्या पर्यायावर विचार करावा. अधिकाऱ्यांनी मार्केटिंगसाठी प्रत्यक्ष बाजारपेठेत उतरुन प्रयत्न करावेत, अशाही सूचना विखे पाटील यांनी केल्या.

बातम्या आणखी आहेत...