आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिपिक लाचेच्या जाळ्यात:भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकाला 20 हजार रुपयांची लाच घेताना अटक

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमिनीची केलेली मोजणी तसेच त्याची हद्द कायम करण्यासाठी २० हजार रुपये लाच घेणा-या इंदापुर तालुक्यातील उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील एका लिपिकाला २० हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर भ्रष्ट्राचार विरोधी प्रतिबंधक कायद्या नुसार बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाराम दत्तात्रय शिंदे (वय 54, रा इंदापूर,पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई मंगळवारी करण्यात आली आहे. या प्रकरणी 41 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदाराला आरोपी लिपिकाने जमीनीची मोजणी केलेल्या क्षेत्राची हद्द निश्चिती कायम करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे लाचलूचपत प्रतिबंधक अधिका-यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

तक्रारदाराच्या काकांच्या नावाने इंदापूरातील निंबोडी येथे जमीन आहे. या जमिनिची मोजणी करण्यासाठी तसेच तीच्या क्षेत्र हद्दीसाठी आरोपी शिंदे याने तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तक्रारदाराने 20 हजार रुपये देण्याचे मान्य केले. पण त्यांना ही लाच द्यायची नसल्याने त्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली.

अधिका-यांनी याची खातरजमा केली. मंगळवारी, भूमी अभिलेख कार्यालयात सापळा लावण्यात आला. तक्रारदाराने शिंदे याला पैसे देताच त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज यादव यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...