आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील धागेदोरे काश्मिरात:लष्कर-ए-तोयबात भरती करणाऱ्या हस्तकाला जम्मू-काश्मीरमधून अटक, करीत होता सुतारकाम

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लष्कर-ए-तोयबासाठी भरती करणाऱ्या हस्तकाला जम्मू-काश्मीरमध्ये बेड्या ठोकण्यात दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) यश आले आहे. पुण्यातून गेल्या आठवड्यात लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या मोहमद जुनैद याला अटक करण्यात आली होती. यानंतर दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी महाराष्ट्र एटीएसचे पथक जम्मू काश्मीरला गेले होते. तेथे त्यांनी गुरुवारी ही कारवाई केली.

हस्तक करीत होता सुतारकाम

लष्कर-ए-तोयबासाठी भरती करणा-या हस्तकाला गुरुवारी अटक केली. लष्कर-ए-तोेयबाचा सदस्य असलेला हा दहशतवादी सुतारकाम करत होता. जुनैदच्या माध्यमातून तो संघटनेत तरुणांची भरती करत होता. आफताब हुसैन शहा (वय 28, रा.जि. किश्तवार, जम्मू काश्मिर) असे महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. आफताब हुसेन हा सुतारकाम करतो. त्यांची किश्तवार येथे जमीनही आहे. तो लष्कर ए तोयबासाठी भरतीचे काम करत होता. दरम्यान त्याचे संबंध परदेशातील लष्करच्या हस्तकांशी असल्याचेही तपासात पुठे आले आहेत.

एटीएसने अशी केली अटक

महाराष्ट्र एटीएसच्या तीन पथकाने स्थानिक पोलिसांशी मिळून गारगील, गंरबंल, श्रीनगर येथील परिसर पिंजून काढला. दरम्यान, आफताब हुसेन हा श्रीनगर पासून 211 किमी किश्तवार जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. त्याला काल रात्री शस्त्रसज्ज असलेल्या एटीएसच्या पथकाने अटक केली.

तो जुनैदचा हँडलर असून त्याला स्थानिक न्यायालयातून 3 दिवसांचा ट्रान्झिट रिंमाड मिळवला आहे. त्याला चौकशीसाठी मुंबईत आणल्या जात आहे. या नंतर त्याला पुण्यात आणून त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.एटीसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील एटीएसचे १२ सदस्यीय पथक गेल्या एका आठवड्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये आहे. या पथकाने जुनैदविरुद्धच्या प्रकरणात अनेक लोकांची चौकशी केली आहे. हमीदुल्ला जरगर, आफताब शाह आणि उमर या तीन जणांचा हे पथक शोध घेत होते. या पैकी आफताब हुसैन शहाला अटक करण्यात एटीएच्या पथकाला यश आले आहे.

पुणे न्यायालयात करणार हजर

अटक केलेल्या संशयिताला चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. त्याला शुक्रवारी पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या आठवड्यात मोहम्मद जुनैद या तरुणाला दहशवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. जम्मू काश्मिरमधील एका दहशतवादी संघटनेशी जुनैद हा संबंधित होता. हे प्रकरण मोठे असल्याने याचा तपासासाठी पुणे आणि महाराष्ट्र एटीएसच्या 12 अधिकाऱ्यांचे पथक जम्मू काश्मीरमध्ये गेले होते. दरम्यान, या पथकाने जुनैदच्या हँडलरला अटक केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये एटीएसचे पथक

एटीसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील एटीएसचे 12 सदस्यीय पथक गेल्या एका आठवड्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये आहे. या पथकाने जुनैदविरुद्धच्या प्रकरणात अनेक जणांची चौकशी केली. हमीदुल्ला जरगर, आफताब शाह आणि उमर या तीन जणांचा हे पथक शोध घेत आहे. हे तिघेही जुनैदच्या संपर्कात होते. लष्कर-ए-तोयबाचा असलेला त्यांचा हस्तक हा जम्मू-काश्मीरमध्ये होता, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवाद्यांकडून मिळाली रक्कम

जुनैदने जम्मू-काश्मीरच्या चार दौऱ्यांमध्ये काही दहशतवादी प्रशिक्षण सत्रे केली आहे. जम्मू-काश्मीर स्थित संघटनेकडून त्याला 10 हजार पौंडांची रक्कम मिळाली होती. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचा रहिवासी असलेला जुनैद सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी गटाच्या संपर्कात आला आणि त्यानंतर धार्मिक व्हिडिओंचा वापर करून त्याचे मतपरिवर्तन करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 24 मे रोजी पुण्यातील दापोडी येथून त्याला अटक करण्यात आली होती.

फेसबुकवर भरतीसाठी खाती

एटीएसच्या अधिकृत माहितीनुसार, झरगरने 'अन्सार गझवतुल हिंद/तौहीद' नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला होता आणि जुनैद या ग्रुपचा भाग होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी देशविरोधी आणि दहशतवादी कारवायांवर चर्चा केल्याचा आरोप आहे. जुनैद वारंवार आपले सिमकार्ड बदलत होता आणि त्याने नवीन सदस्य भरतीसाठी फेसबुकवर विविध खाती तयार केली होती.

बातम्या आणखी आहेत...