आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल बजाज अनंतात विलीन:पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवार, आदित्य ठाकरे आणि बाबा रामदेव यांची होती उपस्थिती

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथील बजाज कंपनीत दिवसभर राहुल बजाज यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राहुल बजाज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील नानापेठ परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, लष्कराच्या जवानांनी त्यांचे शरीर तिरंग्याने झाकून त्यांना राज्य सन्मान दिला, तर त्यांच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी सलामी देण्यात आली.

राहुल बजाज हे 83 वर्षांचे होते. बजाज हे दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या एक महिन्यापासून ते पुण्यातील रुबी क्लिनिक रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या पार्थिवाला अंतिम निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गज बजाज कंपनीत पोहोचले. यात योगगुरू बाबा रामदेव यांचाही सहभाग होता.

राहुल बजाज यांना निरोप देण्यासाठी आदित्य ठाकरे पोहोचले

आदित्य ठाकरे अंतिम दर्शनासाठी पुण्यात पोहोचले होते.
आदित्य ठाकरे अंतिम दर्शनासाठी पुण्यात पोहोचले होते.

राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ हेही येथे पोहोचले. याशिवाय साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना सरचिटणीस मिलिंद नार्वेकरही त्यांना निरोप देण्यासाठी पोहोचले. दुपारी 3 वाजता त्यांचे पार्थिव पुण्यात आणले असून सायंकाळी 5 वाजता नानापेठ येथील वैकुंठ धाम येथे शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील हेही अंतिम दर्शनासाठी पोहोचले.
साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील हेही अंतिम दर्शनासाठी पोहोचले.

बजाज यांना न्यूमोनिया आणि हृदयाची समस्या होती
रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुर्वेझ ग्रँट म्हणाले की, त्यांना न्यूमोनिया झाला होता आणि हृदयाचा त्रासही होता. राहुल बजाज यांनी दुपारी 2.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित होते.

पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...