आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हास्य योग':चांगल्या आरोग्यासाठी 'हसत हसत पळा, पळता पळता हसा', शरीर, मनाच्या सुदृढतेसाठी उपयुक्त - पांडुरंग तावरे

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीर व मनाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी हास्य योग अतिशय उपयुक्त आहे. हास्य योगाने प्रत्येकाच्या जीवनात नवचैतन्य फुलावे. त्यातून ते खऱ्या अर्थाने धनवान होतील. शेतकऱ्यांच्या, तसेच एकाकी जीवन जगणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी नवचैतन्य हास्ययोग परिवाराने पुढाकार घ्यावा असे मत कृषी पर्यटनाचे प्रणेते पांडुरंग तावरे यांनी व्यक्त केले.

जागतिक हास्य दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात हास्य प्रात्यक्षिके व व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रसंगी 'आनंद फुलविणारे कृषी पर्यटन' या विषयावर पांडुरंग तावरे बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व शेवटी हास्ययोगाच्या विविध प्रकारातून विठ्ठल काटे व सुमन काटे आणि मकरंद टिल्लू यांनी प्रात्यक्षिके घेतली.

यावेळी प्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले, बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर, गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर आशिष कासोदेकर, उद्योजक प्रसन्न पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे व सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव पोपटलाल शिंगवी, उपाध्यक्ष विजय भोसले व सहकारी आदी उपस्थित होते.

पांडुरंग तावरे म्हणाले, कृषी क्षेत्रातही गमतीजमती असतात. पर्यटन क्षेत्रात अनेकदा गमतीचे प्रसंग येतात. त्यातून हास्याचे धुमारे उडतात. कृषी पर्यटना दरम्यान परदेशी लोकांशी संवाद करताना सांकेतिक आणि हास्याची भाषा उपयोगी पडते. हास्य क्लबच्या माध्यमातून शेतकरी, कृषी पर्यटन केंद्रावर कार्यक्रम करावेत.

सुनील गोडबोले यांनी रंगभूमी व मालिकेतील किस्से सांगत श्रोत्यांना हसवले. ते म्हणाले, हास्ययोगाचा उपयोग मला अनेक चित्रपटांत झाला आहे. लोकांना आनंदी ठेवण्यासाठी विनोदी काम करण्यावर भर दिला. संपत्ती आणि संस्कार दोन्ही महत्वाचे असले, तरी त्यात संस्कार मूल्ये अधिक महत्वाचे आहेत. संपत्ती 'विल' तयार करते, तर संस्कारमूल्ये 'गुडविल' तयार करतात.

आशिष कासोदेकर म्हणाले की जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन असे क्लब देतात. हास्य क्लब सर्वत्र पोहोचले, तर भवताल आनंदमय होईल. रनिंग, सायकलिंग, वाकिंग यातून येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी ७६ लाख किलोमीटरचा प्रवास करण्याचे उद्दिष्ट आहे. चांगल्या आरोग्यासाठी 'हसत हसत पळा, पळता पळता हसा' आणि 'बी टुगेदर, अचिव्ह टुगेदर, सेलिब्रेट टुगेदर' हे कानमंत्र त्यांनी दिले.चांगल्या मानसिक व शारीरिक आयुष्यासाठी हास्य क्लब उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नवीन गृहप्रकल्प देताना आम्हीही हास्य क्लब अमेनिटी म्हणून देण्याचा विचार आहे. आनंदी विचार देणारे हास्य क्लब वाढण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे दिलीप कोटीभास्कर यांनी नमूद केले.