आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय:लॉरेन्स बिष्णोई टोळी साथीदारांकडे जाधव राहिलेल्या ठिकाणांचा पोलिस करणार तपास; 27 जूनपर्यंत कोठडी

पुणे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंचर येथील ओंकार बाणखेले तरुणाच्या खुनाच्या गुन्हयात पसार असलेला आरोपी संतोष जाधव आणि त्याला आश्रय देणारा सौरभ महाकाळ यांचे नाव पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून समोर आले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले असून जाधवसह चार जणांना सोमवारी विशेष सत्र न्यायाधीश एस. नावंदर यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले. तसेच आरोपींना 27 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

27 जूनपर्यंत कोठडी

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना संतोष जाधव याचा आणखी एक साथीदार तेजस शिंदे याला अटक केली आहे. त्याला ही न्यायालयाने 27 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विविध गुन्हयात फरार असताना संतोष जाधव हा राजस्थान मध्ये लॉरेन्स बिष्णोई टोळीमधला साधीदार आहे. आरोपी जाधव याला गुजरात, राजस्थान, पंजाब व दिल्लीत पुढील तपासासाठी नेण्यात येणार आहे.

गुन्हा दाखल

शिंदे हा आरोपी जाधव सोबत राजस्थानसह इतर राज्यात फिरल्याचे स्पष्ट झाल्याने तसेच त्याच्यावर राजस्थान मध्ये एक गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याची देखील पोलिस सखोल चौकशी करत आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. विजय फरगडे तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. यशपाल पुरोहित यांनी न्यायालयात बाजू मांडली. या केसचा पुढील तपास खेडचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन पाटील करत आहे.

तपास पथकाला बक्षीस

सोमवारी पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हे आढावा बैठक पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये गुजरात मध्ये जाऊन एलसीबीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस हवालदार विक्रम तापकीर, पोलिस नाईक संदीप वारे, पोलिस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांनी मोक्का व खुन प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधव यास अटक केली व सुखरुप त्याला घेऊन पुण्यात आणले. याची दखल घेत सदर पथकाचे गुन्हे आढावा बैठकीत पोलिस अधीक्षकांनी अभिनंदन करत त्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...