आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक ते आमदार:लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने पिंपर - चिंचवड भाजपमध्ये पोकळी; खंदा पक्ष संघटक गेला!

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे पिंपरी - चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवारी सकाळी रुग्णालयात निधन झाले. पिंपरी - चिंचवड मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे पक्ष संघटना वाढवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनामुळे भाजपचा खंदा पक्ष संघटक हरपला आहे.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप दोन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक झाली. प्रबळ इच्छाशक्तीमुळे अखेरपर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील स्थानिक दमदार आमदार म्हणून लक्ष्मणभाऊ यांच्याकडे पाहिले जायचे.

जगताप 1986 मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. नंतर स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली. सन 2000 मध्ये ते शहराचे महापौर होते. 2017 मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमदार जगताप यांचे नाव मंत्री पदासाठी आघाडीवर होते. आता त्यांच्या निधनामुळे भाजपा पुढे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या निधनावर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दु. 3 ते 6 या वेळेत पार्थिव त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्या 7 वाजता अंत्यविधी पिंपरी गुरव येथे होईल

बातम्या आणखी आहेत...