आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरण:शिवसेना नेते रघुनाथ कुचिकांचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; चित्रा वाघ यांचा दावा

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक हे बलात्कार गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पीडितेने कोणत्या दबावाखाली नाव घेतले ते समोर आले आहे, असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. त्या पुण्यात बोलत होत्या.

कुचिकांचा जामीन रद्द करा...

वाघ म्हणाल्या, शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कार गुन्ह्यात आरोपी असून याप्रकरणात माझ्यावर नाहक आरोप करण्यात आले होते. कुचिक विरोधातील सर्व पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पीडितेने कोणत्या दबावाखाली नाव घेतले ते समोर आले आहे. सदर पीडितेने मला पुन्हा मदत मागितली आहे. कुचिक यांचा जामीन अर्ज रद्द करावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत राहणार.

मुंबई पोलिस असवंदेनशील

वाघ पुढे म्हणाल्या, मुंबई पोलिस आयुक्तांनी सहा जून रोजी एक कार्यालयीन आदेश काढला आहे. पॉस्को गुन्ह्यात या पुढील काळात गुन्हा दाखल करण्यासाठी सहाय्यक पोलिस उपायुक्त यांची शिफारस आल्यानंतर संबंधित विभागाचे पोलिस उपायुक्त बलात्कार, विनयभंग गुन्हा दाखल करतील असे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून सरकारची असंवेदनशीलता दिसून येते. मुंबई पोलिसांना अशाप्रकारे आदेश करण्याचे कोणतेही अधिकार नाही. मात्र, लहान मुलींच्या संदर्भात असलेली गुन्ह्यांची संख्या कमी करावी यादृष्टीने ही पळवाट काढली आहे. खोट्या तक्रारी येत असतील, तर त्याची चौकशी करून कारवाई पोलिसांनी करावी. अशाप्रकारे तुघलकी निर्णय लवकर मागे घेणे जनहिताचे ठरणारे आहे. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी याबाबत अद्याप कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे.

माझे नाव जोडू नका...

चित्रा वाघ म्हणाल्या, जिथे जागा खाली होतात, त्याठिकाणी माझ्यावरील प्रेमामुळे प्रसामाध्यमे माझे नाव चालवतात. विधान परिषद निवडणुकीत मी इच्छुक नव्हते, कारण अनेक वर्ष लोक पक्षात काम करत आहेत. राषट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत माझे नाव संभाव्य उमेदवार म्हणून माध्यमांनी जोडू नये.

पक्षात तीनच वर्षे झाली...

चित्रा वाघ म्हणाल्या, विधान परिषद निवडणुकीत चार पक्ष असतानाही एका महिलेस उमेदवारी भाजपने दिली याचा मला आनंद आहे. माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही. ज्या पक्षात २० वर्ष काम केले तिथे अपेक्षा केली नाही, तर भाजपत येऊन मला तीनच वर्ष झाली आहेत.

अकेला देवेंद्र क्या करेगा...

चित्रा वाघ म्हणाल्या, राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवार चांगल्या प्रकारे मते मिळून निवडून आले याचा आनंद आहे. अकेला देवेद्र क्या करेगा...यावर टीका करणाऱ्यांना या विजयातून उत्तर मिळाले आहे . विजयाची ही घोडदौड आगामी काळात अशाचप्रकारे सुरूच राहील.

बातम्या आणखी आहेत...