आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यपालांना आव्हान:राजभवन सोडून बाहेर मैदानात यावे, आम्हीही राजकारण करू; संजय राऊतांचे भगतसिंह कोश्यारींना आव्हान

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे महाराष्ट्राचा अपमान
  • फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेता होण्याची क्षमता - राऊत

राज्याचे मुख्यमंत्री हे लाेकनियुक्त असतात त्यामुळे राज्यपालांना राज्यकारभाराचे अधिकार नसतात. राज्यपालांसाठी राजभवन ही उत्तम जागा असून त्याठिकाणी त्यांनी आरामात राहावे. त्यांची नियुक्ती केंद्र करत असले तरी त्यांचा खर्च राज्य शासन करते. राजभवन हे राजकारण करण्याची जागा नाही. राजभवन व राज्यपाल या पदास घटनात्मक महत्त्व असल्याने त्यांचा आम्ही आदर करताे. राजभवन साेडून बाहेर मैदानात या आम्ही राजकारण करू, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. राज्याचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे ते म्हणाले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयाेजित वार्तालाप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोइटे, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे उपस्थित हाेते.

राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सुरुवातीला २५ दिवसांत काेसळेल, अशा पैजा लावल्या जात हाेत्या. त्यानंतर सरकार एक महिना, दाेन महिन्यांत पडेल अशी शक्यता वर्तवली जात हाेती. मात्र, सरकारने एक वर्ष ताकदीने पूर्ण केले असून पाच वर्षांचा कालावधी सरकार पूर्ण करेल. मधला काळ संकटाचा हाेता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काेराेनाची लढाई चांगल्याप्रकारे हाताळली. मुख्यमंत्र्यांनी आराेग्यविषयक संकटाचे नेतृत्व केले. त्यामुळे हानी कमी झाली अन्यथा अराजकता झाली असती. राज्यात सरकार समाेर अनेक आव्हाने आहेत. आव्हान निर्माण करणे विराेधकांचा अजेंडा आहे. ती आव्हाने आपण राज्यासमाेर निर्माण करत आहोत हे विराेधकांनी लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रात सुदैवाने मजबूत विराेधी पक्ष आहे. चांगल्या विराेधी पक्षाचे मी स्वागत करताे. उत्तम विराेधी पक्ष असल्याशिवाय देश किंवा राज्य पुढे जाऊ शकत नाही. महाराष्ट्रात विराेधकांची माेठी परंपरा आहे. पण, दुर्दैवाने आज जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांना राजकारणात, समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका दिसते जी देशाला घातक आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चांगला संवाद आहे. ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून जी भूमिका विराेधी पक्षाने घेतली आहे ती लाेकशाहीला याेग्य नाही.

फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेता होण्याची क्षमता

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ध्यानीमनी नसताना सत्ता गेली याचा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यातून बाहेर पडून त्यांनी पुढील राजकारण केले पाहिजे. फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेता हाेण्याची क्षमता आहे. एक तरुण मुलगा या देशातील राजसत्तेला आव्हान देत असून हजाराे, लाखाेंच्या सभा ताे घेत आहेत. लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव थाेड्याच दिवसांत मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. माेफत काेराेना लसीची भाजपने घाेषणा केल्यानंतर निवडणूक आयाेग आक्षेप घेत नाही.