आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:लेफ्ट. कर्नलनेच फोडला सैन्यभरतीचा पेपर; पुणे पोलिसांनी दिल्लीत केली दोघांना अटक

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतातील सैन्य दलात शिपाई भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडली

भारतीय थलसेनेत विविध पदांसाठी भरतीचा लेखी पेपर दिल्लीतील लेफ्टनंट कर्नलनेच फोडल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित भगतप्रीतसिंग बेदी या लेफ्टनंट कर्नलसह त्याचा वीरप्रसाद यांना खंडणीविरोधी पथकाने दिल्लीतून अटक केली आहे.

भारतातील सैन्य दलात शिपाई भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून सैनिक भरती प्रशिक्षण केंद्रप्रमुखांना विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांना पुणे पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. याप्रकरणी वानवडी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर संपूर्ण भारतात होणारी सैन्यदलाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. किशोर गिरी (४०) माधव गित्ते (३८), गोपाळ कोळी (३१) व उदय आवटी (२३) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. यातील कोळी आणि आवटी हे सैन्य दलातील कर्मचारी आहेत.

पुण्यासह भारतातील ४० परीक्षा केंद्रांवर सैनदलाच्या रिलेशन आर्मी शिपाई भरतीची परीक्षा २८ फेब्रुवारीला होणार होती. संबंधित परीक्षेला देशभरातून ३० हजार विद्यार्थी बसले होते. परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून काही जण प्रश्नपत्रिका सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरपूर किमतीने विकणार असल्याची माहिती सदर्न कमांड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझनला मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी वानवडी आणि विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचून कारवाई करून सात जणांना अटक केली होती. अधिक चौकशीत संबंधित पेपर वसंत किलारी याच्याकडून आल्यानंतर पथकाने त्यालाही अटक केली. त्यानंतर सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकारी भगतप्रीतसिंग बेदी यानेच पेपर लीक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

बातम्या आणखी आहेत...