आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात राजकीय भुकंप आले असून, महाविकास आघाडी सरकार संकटामध्ये सापडली आहे. शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महाविकास आघाडी सरकार राहते की, पडते हा प्रश्न पडलाय आहे. दरम्यान, पुण्यात "मी पुन्हा येईल" असे म्हणणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लागले आहेत. त्या पोस्टरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याचे साकडे विठ्ठलाला घालण्यात आले आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह आणखी 45 सेनेच्या आमदारांनी बंड पुकारला आहे. हे सर्व बंडखोर आमदार भाजप केंद्रशासित प्रदेश आसामच्या गुवाहाटीत कालपासून तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असलेले अनेक जण एकनाथ शिंदेंच्या गटात जात आहेत. त्यात आता एकनाथ शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याची देखील चर्चा आहे.
पुण्यात फडणवीसांचे पोस्टर
पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लागले असून, त्यात फडणवीस मुख्यमंत्री होवो अशा मागणीचे पोस्टर लावण्यात आलेले आहे. भाजपच्या वतीने हे पोस्टर लावण्यात आले असून, त्यात लिहले आहे की, "हे माऊली तुझा कृपा आशिर्वाद सदैव राहू दे तुझ्या पंढरपुरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे" असा मजकूर त्या पोस्टरमध्ये लिहण्यात आला आहे. सोबतच पोस्टरवर देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांचा एक जुना फोटो देखील छापण्यात आला आहे.
मुंबईत शिंदेची पोस्टरबाजी
मुंबईत देखील एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजीला सुरूवात झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी शिंदेची पोस्टर लावण्यात आले असून, त्यावर लिहले आहे की, "लोकांचा लोकनाथ एकनाथ, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे यांना मनापासून शुभेच्छा... साहेब आगे बढो, हम आपके साथ है!" अशी पोस्टरबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.