आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिक्षा भाडेदर वाढीविषयीची प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणेची बैठक सतत पुढे ढकलली जात आहे. हा उशीर रिक्षा चालकाला मानसिक ताणासह न परवडणारी आर्थिक तोशीस देणारा आहे. म्हणून रिक्षा भाडेदर बाढीचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने तात्काळ घ्यावा. भाडेदर लागू होण्यासाठी अॅपला परवानगी, राज्य सरकार प्रमाणेच केंद्र सरकारने सीएनजीवरील कर कमी करावा या व इतर मागण्यांसाठी आज रिक्षा पंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरीसमोर 'अभंग दिंडी निदर्शने' हे अभिनव आंदोलन करण्यात आले.
सामान्य माणसाचे दुःख मांडणारे अभंग रिक्षाचालक वारकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकारी कचेरीसमोर सामूहिकपणे म्हंटले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांना पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. त्यातील रिक्षाभाडे दरवाढीच्या मागणीसह विविध मागण्यांविषयी पालख्या पुण्यातून रवाना होताच बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिल्या. तसेच मागील महिन्यात सासवड येथे निर्घुणपणे खून करण्यात आलेल्या कचरावेचकांच्या हत्याकांडाच्या तपासाविषयीही त्यांनी जिल्हा पोलिस यंत्रणेला लेखी सूचना दिल्या. यावेळी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या अध्यक्ष सुरेखा गाडे यांच्यासह रिक्षा पंचायत व काच पत्रा पंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत व निवेदनात आणखी पुढील विषय उपस्थित करण्यात आले.
हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कचेरीसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अभंग गात दिंडी जिल्हाधिकारी कचोरी समोर . तेथे संत तुकारामांचा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, संत नामदेवांचा तुझा माझा देवा कारे वैराकार दुःखाचे डोंगर दाखवीसी, संत कान्होपात्रा यांचा नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ , संत कर्ममेळा यांचा जरी तुम्हा उबग आलासे दिनांचा अभिमान कोणाचा , संत सोयराबाईंच्या आमची दशा विपरीत झाली ,कोण आम्हा घाली पोटामध्ये, संत जनाबाईंचा अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या असे विविध अभंग रिक्षाचालक वारकर्यांनी म्हटले. यामध्ये मुळातच वारकरी असलेले गणपत मालपोटे, भरत उत्तेकर बाळासाहेब पोकळे, अण्णा कोंडेकर मधुकर भुजबळ काशिनाथ शेलार इ. वारकरी रिक्षाचालकांचा समावेश होता. पेटी हे मुख्य वाद्य दिंडीत होतीच.शिवाय डोक्यावर पांढरी टोपी, कपाळावर वारकरी गंध आणि गळ्यात टाळ अशा पेहरावातील रिक्षाचालकांची दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.