आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Like Pune, We Should Get A Deputy Mayor In Mumbai; Ramdas Athawale's Demand To BJP To Give The Post Of Mayor If There Is Reservation

रामदास आठवलेंची भाजपकडे मागणी:पुण्याप्रमाणे मुंबईत आम्हाला उपमहापौरपद मिळावे; आरक्षण असल्यास महापौरपद द्यावे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप बहुमताने युती विजयी होईल. भाजप आणि शिंदे गट यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. मुंबईमध्ये आम्हास पुण्याप्रमाणे उपमहापौरपद मिळावे आणि जर आरक्षण पडले, तर महापौरपद मिळावे अशी मागणी मंगळवारी केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी केली.

आठवले म्हणाले, सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्री पद आणि 12 विधान परिषद जागेत स्थान मिळावे, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आठवले बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट, सरचिटणीस पांडुरंग सरोदे, खजिनदार अभिजित बारबाई व्यासपीठावर उपस्थित होते.

आठवले म्हणाले, आमचा पहिला महापौर चंद्रकांत हांडोरे हे मुंबईत काँग्रेससोबत युतीत असताना झाले होते. अनेक ठिकाणी आम्हास भरभरून यश मिळाले. आघाडी सरकार सत्तेतून गेल्याने लोक आनंदात आहेत. युतीचे सरकार पडणार आहे आणि अडीच वर्ष सरकार टिकेल. त्याचसोबत पुढील पाच वर्ष ही आम्ही सत्तेत येऊ.

​आठवले म्हणाले, पत्रकारांमुळे आमच्यासारखे सामान्य लोक दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. त्यांनी आमचे फोटो, बातम्या दिल्या नसत्या तर आम्ही मोठे झालो नसतो. देशभरात आमची ओळख पत्रकारांमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे पत्रकार यांना संरक्षण दिले पाहिजे, अशी आमची आग्रही मागणी आहे. पत्रकारांनी विरोधात बातमी दिली की त्यांच्यावर हल्ला होणे चुकीचे आहे.

आठवले म्हणाले, पत्रकारांना संरक्षण मिळाले यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही आग्रह करू. माझ्या पाठीशी कार्यकर्त्यांचा मोठा संच असून, आमच्या पक्षाची आर्थिक ताकद नसली तरी मित्र पक्षांना ताकद देण्याचे काम आम्ही करतो. आमचा प्रयत्न असा आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने सर्व समाज घटक आम्ही पक्षात सामील करत आहे. सध्या भटक्या विमुक्त समाज हा ओबीसी मध्ये आहे त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही राष्ट्रीय पातळीवर यापुढे प्रयत्न करणार आहे. त्यांना वेगळे आरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे त्याबाबत विधाते कमिशन ची शिफारस आहे. त्याबाबत आम्ही विचार करत असून लवकरच याबाबत निर्णय होईल.

आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ज्यांनी सेना वाढविण्यास आयुष्यभर काम केले त्यांना स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे. मोठी आणि खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. ते सातत्याने चांगले काम करत असून त्यांचा कामाचा व्याप वाढत असल्याने उद्धव ठाकरे सध्या कुठे दिसत नाही.

शिंदे यांच्यासह इतर 16 आमदारांना न्यायालयात दिलासा मिळेल. बाहेरील व्हीपला काही अर्थ नाही. त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण आहे, ते मिळू शकेल. शिवसेनेत दोनच गट आहेत. मात्र, आमच्यात अनेक गट पडलेले आहेत. आमच्यात ऐक्य होत असेल, तर मी त्यास तयार आहे. शिवसेनेची अवस्था आरपीआय सारखी करण्याची आमची तयारी आहे. शेकडो गटामुळे आमच्या समाजाची अवस्था क्षीण झाली असून आमचा सर्वात प्रभावशाली गट असून ही आमदार, खासदार निवडून आणण्याची ताकद अद्याप आमच्यात नाही.

बातम्या आणखी आहेत...