आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:87.89 लाख रुपयांचा मद्यसाठा पुण्यात जप्त

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी कारवाई करत सुमारे ८७ लाख ८९ हजार ५२० रुपये किमतीचा मद्यसाठा तसेच मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण १ कोटी ५ लाख ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील हॉटेल शांताईसमोर सापळा लावून केवळ गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेला विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणारा ट्रक जप्त केला. यात रिअल व्हिस्कीच्या ४ हजार १६४ सीलबंद बाटल्या व रिअल व्हिस्कीच्या ५ हजार ७६० सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या ९ हजार ६०० बाटल्यांचे बाॅक्स सापडले.

बातम्या आणखी आहेत...