आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील चार हजार ८४० बचत गटांना विविध २० बँकांनी वर्षभरात एकूण २०२ काेटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. चालू वर्षात बचत गटांच्या कर्ज वाटपात भरीव वाढ करून त्यांना सक्षम करण्याचा संकल्प पुणे जिल्हा परिषदेने केला आहे. त्यानुसार या वर्षात एकूण १३ हजार ४३५ बचत गटांना ४०३ काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनेरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युसीओ बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय आदी बँकांच्या माध्यमातून बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी आणि सक्षम बचत गट म्हणून ते नावारुपास यावे यादृष्टीने यापुढे कर्जपुरवठा वाढवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.