आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पुणे-मंुबईतील माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार कपात आणि नोकरी गमवावी लागल्याची प्रकरणे घडली आहेत. नॅशनल इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी एम्प्लॉइज सिनेटकडे ६८ हजार तक्रारी आल्या असल्याचे संघटनेचे सरचिटणीस हरप्रीत सलुजा यांनी सांगितले. यामुळेच आयटी कर्मचाऱ्यांनी ‘जस्टिस फॉर एम्प्लॉइज’ हे ऑनलाइन आंदोलन सुरू केले आहे.
आठवड्यातील पाच दिवस काम, मोठ्या पगाराची नाेकरी, उच्चभ्रू राहणीमान, आंतरराष्ट्रीय कंपन्यांत काम करण्याची संधी यामुळे आयटी क्षेत्रातील नोकरीला प्रतिष्ठा मिळाली. परंतु, काेराेना आणि त्यापाठोपाठ झालेल्या लाॅकडाऊनचा आयटी क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात सुमारे ६ लाख आयटी कर्मचारी असून त्यापैकी साडेतीन ते चार लाख कर्मचारी पुणे परिसरातील विविध आयटी कंपनी, बीपीआे (काॅल सेंटर), केपीआे (बॅक आॅफिस) मध्ये काम करतात,असे सलुजा यांनी सांगितले. मात्र अनेक नामांकित कंपन्यांनी कामगारांना कमी केले, ५० टक्क्यांपर्यंत वेतन कपात किंवा बेंचवर ठेवण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ६८ हजार कर्मचाऱ्यांपैकी अनेकांची नोकरी गेली,काहींना वेतन कपातीला सामोरे जावे लागले आहे.
सरकारी नोटीसीला केराची टोपली :
लॉकडाऊन काळात कर्मचारी अथवा वेतन कपात करु नये, असे केंद्र सरकारने सांगितले होते. त्यानुसार पुणे कामगार आयुक्तांनी काही नामांकित कंपन्यांना नोटीसाही बजावल्या परंतु आयटी कंपन्यांनी या नोटीशींना थेट केराची टोपली दाखवली. दरम्यान,या विरोधात आयटी कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून याबाबत १२ जून राेजीच्या सुनावणीत निर्णय हाेणे अपेक्षित आहे.
१०% कर्मचारीच कामावर :
हिंजवडी आयटी संघटनेचे चीफ आॅपरेटिंग आॅफीसर चरणजीत भाेगल म्हणाले, लाॅकडाऊनमुळे आयटी कंपन्यांनी ‘वर्क फ्राॅम हाेम’ची सुविधा दिली परंतु त्यात अनेक अडचणी आहेत. मुलांचा त्रास हाेणे, पाळीव कुत्रे,मांजरीचे आवाज, लहान घरांमुळे घरात कामासाठी अपेक्षित जागा नसणे, इंटरनेटचा स्पीड कमी असणे, वीज कपात आदी समस्यांचा कर्मचाऱ्यांना सामना करावा लागत आहे. सध्या कंपन्या मध्ये केवळ १० ते १२ टक्केच कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्याकरिता स्वत:चे वाहन वापरण्याची परवानगी नाही. शिवाय बसमध्ये निम्म्या प्रवाशांना परवागनी असल्याने कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे लॅपटॉप कामाकरिता नसल्याने ही कर्मचारी घरुन काम करण्यात अडचणीत आले आहेत. वर्क फ्राॅम हाेम हे दीर्घकाळासाठी काेणत्याही कंपनीला परवडणारे नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.