आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे जिल्ह्यात 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय लोक अदालत:जास्तीत जास्त पक्षकारांनी योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

या लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई, कलम १३८ निगोशिएबल इन्स्टुमेंट्स अ‌ॅक्ट, भूसंपादन, कौटुंबिक प्रकरणे, औद्योगिक कामगार व सहकार न्यायालयातील प्रकरणे मोठया प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत. तसेच विविध बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था तसेच विविध ग्रामपंचायती व पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड मनपा यांचेकडील घरपट्टी, पाणीपट्टीची प्रकरणे, बीएसएनएल, आयडिया व्होडाफोन, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, आदींकडील बाकी असलेली देयके इत्यादी दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्याकरीता मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या मागील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ८ हजारपेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढत पुणे जिल्ह्याने राज्यात आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. लोकन्यायालयात प्रकरण मिटल्याने दोन्ही पक्षकारांमध्ये जिंकल्याची भावना निर्माण होते तसेच दोन्ही पक्षकारांचा पैसा, वेळ व श्रमाची बचत होते. या लोकअदालतमध्ये अद्यापही ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे घेऊन तडजोडीने निकाली काढण्याची इच्छा आहे त्या पक्षकारांनी आपापल्या न्यायालयात अर्ज करुन विनंती करावी. किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुक्याचे ठिकाणी तालुका विधी सेवा समिती कार्यालयाकडे संपर्क साधावा. जास्तीत जास्त पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मंगल दीपक कश्यप यांनी केले आहे.

७ लोक अदालतीतील ठळक नोंदी

  • १२ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या लोक अदालतीत १३ हजार ५६१ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ५ हजार २२६ प्रलंबित तर ८ हजार ३३५ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.
  • १ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या लोक अदालतीत ३३ हजार ६१ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये १५ हजार ५६२ प्रलंबित तर १७ हजार ४९९ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.
  • २५ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या लोक अदालतीत ३ लाख १७ हजार ८३६ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये ८ हजार ९६३ प्रलंबित तर ३ लाख ८ हजार ८७३ दाखलपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...