आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:नवीन शैक्षणिक धोरणात एकविसाव्या शतकातील आव्हानांचा वेध : प्रकाश जावडेकर

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एकविसाव्या शतकातील आव्हानांचा वेध घेत शिक्षण क्षेत्रातील संक्रमण आवश्यक असल्यानेच डाॅ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण आखण्यात आल्याचे मत केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

विद्यापीठ विकास मंच आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ यांच्या वतीने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर शुक्रवारी राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे संस्थापक गजानन एकबोटे, माजी मंत्री आणि शिक्षण संस्थेचे संचालक हर्षवर्धन पाटील, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रवींद्र परदेशी, नारळकर शैक्षणिक संस्थेचे संचालक प्रा. महेश आबाळे या तज्ञांनी मार्गदर्शन केले.

या वेळी जावडेकर म्हणाले, ‘सबको शिक्षा आणि अच्छी शिक्षा’ या सूत्रावर या धोरणाची आखणी करण्यात आली असून अनेकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...