आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:25 कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पत्नी, पुत्राविरोधात लूकआऊट नोटीस

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारकडून आदेश, पुणे पोलिसांनी बजावली नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून (डीएचएफएल) घेतलेल्या २५ कोटींच्या कर्जासंबंधात ही नोटीस जारी करण्यात आली आहे. कर्जाची रक्कम थकीत असल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून आदेश आल्यानंतर गृहमंत्रालयाच्या आदेशाने पुणे पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी ही लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

आमदार नितेश राणे आणि नीलम राणे यांच्याविरोधात एका संस्थेने आर्थिक तक्रार केली होती. यासंबंधी केंद्र सरकारकडून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला एक तक्रार प्राप्त झाली होती. त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत लूकआऊट सर्क्युलर काढण्यास सांगितले. त्यानुसार पुणे पोलिसांनी हे सर्क्युलर काढले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीने ही तक्रार दिली आहे. राणे यांच्या पार्कलाइन प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीने २५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, तर नीलम राणे या कंपनीच्या सहअर्जदार होत्या. त्याची परतफेड न केल्याने दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याशिवाय आणखी एका कंपनीने कोट्यवधींचे कर्ज घेऊन परतफेड न झाल्याने तक्रार दाखल झाली होती.

बातम्या आणखी आहेत...