आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात पैसे गमावले:कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पुण्यातील घटना; विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजारात पैसे गमावल्याने आलेल्या आर्थिक नैराश्यातून पुण्यातील केशवनगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. पती दीपक थोटे (५९), पत्नी इंदू थोटे (४५), मुलगा ऋषिकेश (२१), मुलगी समीक्षा (१७) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. मूळचे ते अमरावती येथील रहिवासी असून २ महिन्यांपूर्वी पुण्यात केशवनगरात वास्तव्यास आले होते. दीपक थोटे हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. पत्नी इंदू या गृहिणी होत्या. मागील काही दिवसांपासून दांपत्याने शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवली होती. मात्र, त्यांना तोटा झाल्यामुळे कुटुंब आर्थिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा आणि मुलीला विषारी औषध पाजले. नंतर पती-पत्नी यांनीही विष पिऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोिलसांनी वर्तवला आहे.