आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषाणूजन्य त्वचाराेग:औरंगाबाद, बीड, नगरसह 10 जिल्ह्यांत गुरांना लम्पी, माणसांत संक्रमणाचा धाेका नाही

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाेवंश आणि म्हैस वर्गातील जनावरांना हाेणारा लंपी स्किन हा विषाणूजन्य त्वचाराेग आहे. हा राेग कीटकांपासून पसरत असून ताे जनावरांपासून मानवास संक्रमित हाेत नाही. पशुधनात वेगाने पसरणारा हा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यातील जळगाव, अहमदनगर, अकाेला, धुळे, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड आदी दहा जिल्ह्यांतील ७१ गावांत या राेगाचा प्रार्दुभाव झाला आहे. बाधित गावांतील एकूण ७६२ पशुधनापैकी ५६० जनावरे उपचाराने बरे झाले असल्याची माहिती राज्याचे पशुसंर्वधन आयुक्तालयाचे आयुक्त सचिन्द्रप्रताप सिंह यांनी गुरुवारी दिली.

सिंह म्हणाले, सध्या देशातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आदी राज्यांत पशुधनात लम्पी त्वचा राेगाचा प्रार्दुभाव दिसून आालेला आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात चिनावल गावात सर्वप्रथम ४ ऑगस्ट राेजी या राेगाची लागण झाल्याचे आढळून आले. सन २०२१-२१ मध्ये राज्यातील २६ जिल्ह्यांत तर २०२१-२२ मध्ये दहा जिल्ह्यांत लम्पी स्कीन राेग आढळून आला आहे. बाधित क्षेत्राच्या पाच किलाेमीटर परिघातील ३०१ गावांतील एकूण एक लाख ३४२ पशुधनास राज्यात लसीकरण करण्यात आले आहे. जळगाव जिल्हयातील रावेर तालुक्यात नऊ व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक अशा दहा बाधित जनावरांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...