आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Lumpy Skin Disease Graph Started To Decrease In The State Total 1436 Livestock Deaths In The State So Far; Vaccination Risk Averted

लंपी चर्म रोगाचा आलेख राज्यात घटण्यास सुरुवात:राज्यात आतापर्यंत एकूण 1436 पशुधनाचा मृत्यू; लसीकरण धोका टळला

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंपी चर्म रोगाचा आलेख राज्यात घटत आहे. लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. हा आजार फक्त पशुधनामध्ये आढळून येतो. आतापर्यंत या रोगामुळे भारतात 85, हजार628 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान मध्ये 55,448, पंजाबमध्ये 17,655, गुजरात मध्ये 5,857, हिमाचल प्रदेशमध्ये 4,347 व हरियानामध्ये 2,321 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

महाराष्ट्रात आत्ता पर्यंत जळगाव जिल्ह्यातील 218, अहमदनगर जिल्ह्यातील 146, धुळे जिल्हयात 28, अकोला जिल्ह्यात 253, पुणे जिल्ह्यात 92, लातूर मध्ये 13, औरंगाबाद 36, बीड 3, सातारा जिल्ह्यात 105, बुलडाणा जिल्ह्यात 178, अमरावती जिल्ह्यात 159, उस्मानाबाद 4, कोल्हापूर 81, सांगली मध्ये 15, यवतमाळ 2, सोलापूर 13, वाशिम जिल्हयात 18, नाशिक 4, जालना जिल्हयात 12, पालघर 2, ठाणे 19, नांदेड 13, नागपूर जिल्हयात 4, हिंगोली 1, रायगड 4, नंदुरबार 11 व वर्धा 2 असे एकूण 1436 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. उपरोक्त बहुतांश मृत्यू हे संबंधित आजारी पशुधनावर तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर उपचारास सुरुवात झाल्यामुळे झाले आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात पशूंना लसीकरण

राज्यामध्ये 31 जिल्ह्यांमधील एकूण 2083 गावांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 39,341 बाधित पशुधनापैकी एकूण 18,381 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 106.62 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील 2083 गावातील 49.69 लक्ष पशुधन आणि परिघाबाहेरील 44.13 लक्ष पशुधन अशा एकूण 93.82 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. तसेच शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असून, त्यासाठी लस देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात जळगाव आणि अकोला या सर्वांत जास्त बाधित जिल्ह्यांमध्ये लसीकरण पूर्ण झाले असून इतर जिल्ह्यातील बहुतांश पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील लसीकरण अंतिम टप्प्यात आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात एक कोटी - सुमारे 70% गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...