आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Lure Of Investment In Business In Pune, Fraud Of 3 Accounts In The Name Of Business Of Buying And Selling Old Cars Of Businessman

पुण्यात व्यवसायात गुंतवणुकीचे अमिष:व्यावसायिकाची जुन्या गाडया खरेदी-विक्री व्यवसायाच्या नावाने 3 कोटींची फसवणूक

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका व्यवसायिकाला जुन्या गाडया खरेदी-विक्री व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असे अमिष दाखवून तीन काेटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात दाेन आराेपी विराेधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

कपिल जगमाेहन धिंग्रा (वय-40,रा.वाकड,पुणे) व गाैरी कपिल धिंग्रा (रा.मुकुंदनगर,पुणे) अशी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे. याप्रकरणी राजेश रामचंद्र मेहता (वय-55,रा.मुकुंदनगर,पुणे) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकार सन 2012 ते 2017 च्या दरम्यान घडला आहे. आराेपी कपिल धिंग्रा व गाैरी धिंग्रा यांनी आपसात संगनमत करुन व्यवसायिक राजेश मेहता यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्यासाेबत कार व्यवसायातून ओळख वाढवून मेहता यांना जुन्या गाडया खरेदी विक्री व्यवसायात 50 टक्के भागीदारी देण्याचे अमिष दाखवून दाेन काेटी रुपये देण्यास भाग पाडले. मात्र, नंतर पैसे देण्यास आराेपीने टाळाटाळ करत असल्याने मेहता यांनी तुमच्या विराेधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे असे सांगितल्यावर त्यांना दिलेल्या रक्कमेपैकी 80 लाख रुपयाच्या माेबदल्यात त्यांचा वाकड परिसरातील प्रिस्टीन प्राेफाईल येथील उच्चभ्रु साेसायटीतील राहता फ्लॅट देत असल्याचे अॅग्रीमेंट ऑफ असायमेंन्ट करार करुन सदर फ्लॅट मेहता यांच्याकडे ताबा दिलेला असताना ही, सदरचा फ्लॅट त्यांचे परवानगी शिवाय कैलास कदम या व्यक्तीस परस्पर विक्री करुन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच उर्वरित रक्कम टप्प्या टप्प्याने देण्याचे आश्वासन देऊन सदर रक्कम परत करण्यास टाळाटाळ करुन व्यवसायात नुकसान झाले आहे असा बनाव करुन तक्रारदार यांच्याकडून ब्रेंन्डेड कार खरेदी करुन घेऊन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी त्याची परस्पर विक्री करुन एकूण 3 काेटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...