आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:ऑइल विक्रीतून नफ्याचे आमिष; नायजेरियनकडून अनेकांना गंडा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला लाॅटरी लागली असून ती मिळवण्यासाठी पैसे भरून फसवणूक, परदेशातून महागडे गिफ्ट पाठवले परंतु ते कस्टमने पकडले ते साेडवण्यासाठी पैसे मागून गंडा घालणे असाे की, लग्नाचे अमिषाने परदेशात उच्चपदस्थ नाेकरी असल्याचे बहाण्याने फसवणुक अशाप्रकारचे गुन्ह्यात नायजेरियन व्यक्ती प्रामुख्याने ऑनलाइन फसवणूक करत असल्याचे प्रकार वारंवार घडताना दिसतात. परंतु सध्या परदेशात औषध बनविण्यासाठीचे ऑईल विक्री करून नफा कमवू या अमिषाने लाखाे रुपयांची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन फ्राॅडच्या घटना तेजीत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणात पुणे सायबर पाेलिसांनी हॅनरी मेकेन्थाेनी (४७,रा.जाेहन्सबर्ग, साऊथ अफ्रिका) आराेपीस जेरबंद करत सदर प्रकार उघडकीस आणला आहे.

सदर प्रकारचे फसवणूक करताना आराेपी हे परदेशातील एखाद्या महिलेचा फाेटाे फेसबूक, व्हाॅटसअपवर ठेऊन त्याद्वारे व्यवसायिकांना हेरतात. त्यांच्याशी फेसबुक, व्हाॅटसअप, माेबाईलद्वारे संर्पक साधून त्यांचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर परदेशातील व्यवसायाचा प्रस्ताव पाठवून विविध प्रकारचे औषध बनवण्यासाठी लागणारा घटक पदार्थ म्हणून आयात करून ते दुसऱ्या देशात विक्री केल्यास चांगल्याप्रकारे परतावा मिळेल असा बहाणा करून वेळाेवेळी पैसे घेऊन फसवणुक केले जात असल्याचे प्रकार घडत आहे. महिलेला ४२ लाखांना गंडा पुण्यातील एका ५७ वर्षीय व्यवसायिकास डार्जेसिका अन्ड्रेड नावाच्या महिलेने व्हाॅटसअपवर व्यवसायाचा प्रस्ताव पाठवून ती बेटरलाईफ फार्माक्विटिक्ल कंपनीची माजी कर्मचारी असल्याचे सांगितले. परंतु वैद्यपकीय अक्षमतेमुळे ती काम करू शकत नाही. मात्र, सदर कंपनीस औषध बनविण्यासाठी लागणारा घटक पदार्थ म्हणून ‘नंदुरी लिक्वीड ऑईल’ हा पदार्थ आयात करण्यासाठी भारतात पुरवठादार विक्रेतेची बाेलणी सुरु असल्याचे सांगितले. भारतात सदर पदार्थाचा दर १२०० युएस डाॅलर प्रती लिटर असल्याचे सांगत कंपनी आतापर्यंत चीनकडून ६३०० युएस डाॅलरला घेत हाेती. या व्यवहारात मी पुरवठादाराची भूमिका केली तर नफ्यातून ३० टक्के तिला द्यायचे ठरले हाेते व तिने त्या विक्रेत्याचे नाव, पत्ता, फाेन, इमेल आदी माहिती व्यवसायिकास देण्याचे ठरले हाेते. त्यानुसार काेणतीही चाचणी अथवा रासायनिक तपासणी न करता ६० लिटर माल खरेदी करण्यासाठी ४२ लाख १४ हजार घेऊन फसवणुक केली. दुसऱ्या प्रकरणात एकाची १७ लाख रुपयांची फसवणूक : पुण्यातील विमाननगर परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यवसायिकाला अज्ञात परदेशी नाव असलेल्या आराेपींनी संर्पक करून आयुर्वेदीक औषधाचे राॅ मटेरियल पुरवठा करण्याच्या बहाण्याने नफ्याचे अमिष दाखवून आेलिबिया सर्जन नावाची महिला व तिचे साथीदार यांनी साेशल मिडियाच्या माध्यमातून संर्पक साधत विश्वास संपादन केला. त्यानंतर सदर व्यवसारासाठी १७ लाख रुपये घेत फसवणूक करण्यात आली आहे. यात नायजेरियाच्या इन्जाेकू जाॅयल स्टेनली यास अटक केली हाेती. या प्रकरणात सर्व आरोपींची चौकशी सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले.

अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये व्हाॅटसअप, फेसबुक, इमेल आदी साेशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी याेग्य ती खबरदारी घ्यावी. अनाेळखी व्यक्तीवर तात्काळ विश्वास न ठेवता त्यांची खातरजमा करावी. आर्थिक व्यवहार करताना बँक खातेधारकाची पडताळणी करून नंतरच सुरक्षितरित्या व्यवहार करण्यात यावा. अनाेळखी व्यक्तींना स्वत:चे बँक खात्याची गाेपनीय माहिती देऊ नये तसेच आर्थिक व्यवहार करु नये. - मीनल सुपे पाटील , वरिष्ठ पाेलिस निरीक्षक , सायबर पाेलिस ठाणे-पुणे

बातम्या आणखी आहेत...