आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या आणखी एका नेत्यावर गुन्हा:साखर कारखान्याची खोटी बिले बनविल्याप्रकरणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांसह तिघांवर गुन्हा

सातारा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह तिघांवर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिगंबर आगवणे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झालेला आहे.

लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याची खोटी बिले बनविल्याप्रकरणी दिगंबर आगवणे यांनी खासदार निंबाळकर यांच्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती. पण या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे आगवणे यांनी खासदार निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

न्यायालयात धाव घेत आगवणे यांनी दाद मागितली. या प्रकरणात न्यायालयाने संबंधित खासदारासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर फलटण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोट्यावधींची फसवणूक केल्याचा आरोप

लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कारखान्याची खोटी बिले बनविल्या प्रकरणी रणजितसिंहांवर गुन्हा दाखल करण्यात आला. खासदार निंबाळकरांनी आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे आगवणेंनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्याविरुद्ध फलटण पोलिस ठाण्यात भा.द.वि. 405, 406, 418, 420, 467, 468 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...