आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेते माधव भांडारी यांच्या पत्नीचे निधन:अल्पशा आजाराने सुमित्रा भांडारींनी वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
दुपारी 4.00 वाजता अंत्यसंस्कार - Divya Marathi
दुपारी 4.00 वाजता अंत्यसंस्कार

भाजप नेते माधव भांडारी यांच्या पत्नीचे काल रात्री पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. माधव भांडारी यांच्या प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी सुमित्रा भांडारी यांचे ​​​​​पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शहरातील नवी पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी 4.00 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा माधव भांडारी -वेलणकर यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाले. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. परभणीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नानासाहेब वेलणकर यांच्या त्या कन्या होत्या.

अभविपच्या माध्यमातून केले काम

सुमित्रा भांडारी-वेलणकर यांनी विद्यार्थी दशेत परभणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केले होते. लग्नानंतर त्या पुणे व कोकण विभागात विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्याशी संलग्न होत्या. दरम्यान त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने भांडारी व वेलणकर कुटुंबीयांना,नातेवाईक, मित्र परिवारास मोठा धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...