आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षात धक् धक् गर्लची सरप्राईज एंट्री:माधुरी दीक्षितने पती डाॅ. श्रीराम नेनेंसोबत 'पिफ'मध्ये घेतला मराठी 'पंचक' सिनेमाचा आस्वाद

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारची दुपार पुण्यातील चित्रपट रसिकांना सुखावणारी ठरली ती धक धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या सरप्राईज व्हिजीटमुळे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रविवारी दुपारी 'पंचक' हा मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागात दाखवण्यात आला. माधुरीचे पती डाॅ. श्रीराम नेने या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. डॉ. नेने यांच्यासह धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांनी पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात 'पिफ'ला भेट दिली.

माधुरीसह डॉ. नेनेंनी बघितला चित्रपट

दुपारच्या सुमारास माधुरी दीक्षित यांच्या आरएनएम मुव्हींग पिक्चर्सची निर्मिती असलेला पंचक हा मराठी चित्रपट महोत्सवादरम्यान मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभागात दाखविला गेला. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान माधुरीने स्क्रीनला आपल्या चित्रपटाच्या टीमसह भेट दिली. या वेळी माधुरी व डॉ. नेने यांनी उपस्थितांसोबत चित्रपटाचा आस्वाद घेतला. माधुरीच्या या सुखद उपस्थितीत पंचक चित्रपट पाहण्याची संधी मिळाली, यामुळे उपस्थित रसिक उत्साहित झाले होते. त्यांनी माधुरीचे जोरदार स्वागत केले.

स्पेस कलात्मक वापरणे कौशल्य - शाजी करुन

"एखादा सिनेमा बनवताना त्यातील मोकळ्या जागा अर्थात स्पेस ही अधिक कलात्मकरित्या कशी वापरायची हे खरे कौशल्य असते. यासाठी रंगसंगती, पार्श्वसंगीत, आणि इतर घटकांचा वापर उपयुक्त ठरू शकतो, असे मत दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर शाजी करुन यांनी व्यक्त केले.

पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आयोजित मास्टर क्लास'मध्ये करून यांनी ‘थिंकिंग इमेजेस’ याविषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात नखाते यांनी करुन यांच्याशी संवाद साधला.

सिनेमातील प्रत्येक इमेज मौल्यवान

करुन म्हणाले, "सिनेमा हे एक प्रवाही माध्यम आहे. त्यामुळे त्यातील मोकळ्या जागेचे महत्व समजून घेण्याची गरज आहे. रंग, संगीत, एखादी वस्तू अशा विविध घटकांच्या सहाय्याने या मोकळ्या जागेचा वापर कलात्मक स्वरूपात करता येऊ शकतो. सिनेमात प्रत्येक इमेज ही मौल्यवान असते. त्यामुळे ती इमेज घडविताना तुमचे लक्ष पूर्णपणे त्यावर केंद्रित असावे. ज्यावेळी तुम्ही तुम्हाला हवी असलेली इमेज यशस्वीपणे साकारता त्यावेळी ती एक ऐतिहासिक कलाकृती बनते."

लक्षावधी आठवणी, विचार म्हणजे सिनेमा

करुण म्हणाले, आपल्या मनात असणाऱ्या लक्षावधी आठवणी आणि आपल्या डोक्यातील असंख्य विचार यांचे एक विस्तृत चित्रण म्हणजे सिनेमा आहे. गणिती विश्लेषण आणि विज्ञानाच्या जोडीने सिनेमा ही एक उत्कृष्ट कलाकृती बनू शकते. ही कलाकृती तुम्हाला आनंद आणि अध्यात्म या दोघांची अनुभूती देते.

कान्सला निवड, करुन एकमेव

मूळचे केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्याचे रहिवासी असणारे 71 वर्षीय करुन यांनी अनेक चांगल्या कलाकृती घडविल्या आहेत. गेल्या 25 वर्षांतील ते एकमेव व्यक्ती आहेत ज्यांचा चित्रपटाची कांन्स चित्रपट महोत्सवाचा स्पर्धात्मक विभागात निवड झाली होती.

बातम्या आणखी आहेत...