आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसब्यातून ठाकरे गटाचा मित्र पक्ष संभाजी ब्रिगेड मैदानात:वंचितही लढण्याच्या तयारीत; 'मविआ'ला बसणार फटका, शिवसेनेची कोंडी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. मात्र संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शिवसेना चांगलीच कोंडीत अडकली आहे.

बहुचर्चित ठरणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने कसबा पेठ येथून हेमंत रासने यांना तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर काँग्रेसने कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी निश्चित केली आहे.

अविनाश मोहिते यांना उमेदवारी

संजय राऊत यांनी नुकतेच महाविकास आघाडीने जिंकणे हे एकमेव ध्येय असल्याचे वक्तव्य केले होते. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद, रस्सीखेच नाही. कसबा, पिंपरी, चिंचवड याठिकाणी आम्ही स्पिरीटने लढू. असेही राऊत यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

शिवसेना नक्कीच तोंडघशी

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची काही दिवसांपूर्वी युती झाली आहे. याबाबत मोठा सोहळा उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. अविनाश मोहिते आज उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेना मात्र नक्कीच तोंडघशी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रकाश आंबेडकर आज निर्णय घेणार

वंचित बहुजन आघाडीनेही शिवसेनेसोबत युती केली आहे. मात्र संभाजी ब्रिगेडसोबतच वंचित बहुजन आघाडीनेही कसबा निवडणूत लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कसब्याची जागा लढायची की नाही याबाबत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आज निर्णय घेणार आहेत.

संबंधित वृत्त

कसबा पेठेत बॅनर्सद्वारे भाजपला सवाल

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? असा सवाल विचारणारे बॅनर्स कसबा पेठेत लागले आहेत. कसबा, पिंपरी-चिंचवड मतदारसंघाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाकारण्यात आली. तेव्हापासून भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...