आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामेट्रोने बांधलेला पूल गिनीज बुकात:जगातील सर्वात लांब डबल डेकर पूल म्हणून गौरव

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामेट्रोने नागपूर येथील मेट्रो प्रकल्प राबविताना वर्धा येथे डबल डेकर पुलाची निर्मिती केली. यामध्ये पहिल्या मजल्यावरुन रस्ता असून त्यावर वाहने जातील तर त्याच्या वरील पुलावरून मेट्रो जाईल, अश्याप्रकारे डबल डेकर व्हायाडक्त महामेट्रोने वर्धा रोड येथे बांधला. या डबल डेकर व्हायाडक्तची लांबी 3.14 किमी असून त्याची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् यामध्ये आधीच सर्वात लांब डबल डेकर पूल म्हणून नोंदविली आहे.

हा डबल डेकर व्हायाडक्त जगातील सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्त असेल या संबंधी महामेट्रोने गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याशी संपर्क साधला होता. सर्व दाव्यांची सुनिश्चिती केल्यानंतर गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या लंडन येथील मुख्यालयाने नुकतेच महामेट्रोला वर्धा रोड येथील डबल डेकर पूल हा जगातील सर्वात लांब डबल डेकर पूल आहे अशी पुष्टी दिली आणि त्यासंबंधीचे पत्र महामेट्रोला पाठविले.

मंगळवारी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी ऋषी नाथ यांनी नागपूर येथे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार केला

वर्धा रोडवरील डबल डेकर व्हाया-डक्ट प्रकल्प राबविणे एक मोठे आव्हान होते. हा 3-स्तरीय संरचनेचा भाग आहे ज्याच्या वरच्या बाजूला मेट्रो रेल्वे, मध्यम स्तरावर महामार्ग उड्डाणपूल आणि जमिनीच्या पातळीवर विद्यमान रस्ता आहे. 3.14 किमीचा डबल डेकर व्हायाडक्ट ही जगातील कोणत्याही मेट्रो रेल्वे प्रणालीतील सर्वात लांब संरचना आहे.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे कि, महामेट्रोने नागरिकांच्या सुविधेसाठी वर्धा रोड येथे राष्ट्रीय महामार्ग आणि महामेट्रो यांच्या संयुक्त प्रयत्नांतून 3.14 किमी डबल डेकर पुलाचे अत्यंत्य तांत्रिक दृष्ट्या किचकट असे काम पूर्ण केले. त्यामुळे वर्धा रोड येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. महा मेट्रोने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अंतर्गत नोंद होण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने महामेट्रोचा दावा मान्य करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देण्याची घोषणा केली.

या अतिशय मानाच्या रेकॉर्डसाठी महा मेट्रोच्या प्रकल्पाची निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. या अश्या व्हायाडक्तला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाल्याने महामेट्रोच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचा अभिमान वाटत आहे.

बातम्या आणखी आहेत...