आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची कारवाई:​​​​​​​पुणेकरांनी कोरोना नियम धाब्यावर बसवून भुशी डॅमवर केली गर्दी, नियम मोडणाऱ्यांना पोलिसांनी दाखवला घरचा रस्ता

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोरोनाची दुसरी लाट ही ओसरत असली तरही रुग्ण संख्या पूर्णपणे कमी झालेली नाही. डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका अद्यापही कायम आहे. यासाठी राज्य सरकारने निर्बंधांमध्ये पूर्णपणे सूट दिलेली नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुण्यामध्ये पर्यटनस्थळावर कडक अंमलबजावणीचे आदेश पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवा यांनी दिले आहेत. तरीही सुद्धा पर्यटन स्थळावर मोठ्याप्रमाणात गर्दी होतानाच पाहायला मिळत आहे. आज भुशी डॅम येथे पोलिसांनी कारवाई केली आहे.

लोणावळ्यातील भुशी डॅम येथे पर्यकटांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण आहे. तरीही थोडेफार निर्बंध शिथिल केल्याचा फायदा पर्यटक घेत असल्याचे दिसत आहे. आज कोरोना नियम धाब्यावर बसवून भुशी डॅम परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. कुठेही सोशल डिस्टेंसिंगचे पालन होत नव्हते. तसेच अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता. दरम्यान पोलिसांनी पर्यटनबंदीचा आदेश डावलणाऱ्या पर्यटकांना घरचा रस्ता दाखवला आहे. सर्व पर्यटकांना पोलिसांनी हुसकावून लावले आहे. आता भुशी डॅमवर पोलिस कर्मचारी उभे आहेत, पर्यटकांना येथे येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...