आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Maharashtra Heavy Rain : Emergency Relief Of Rs 10,000 For Flood hit Families And Rs 5,000 For Foodgrains; Thackeray Government's Decision

ठाकरे सरकारची घोषणा:घरात पाणी शिरलेल्या कुटुंबांना 10 हजार रुपयांची तातडीची मदत, तर पाच हजारांचे धान्य; सरकारचा निर्णय

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूरग्रस्तांना 2019 च्या जीआर प्रमाणे मदत दिली जाणार आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात तुफान पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे भीषण परिस्थिती निर्माण झाली. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. नागरिकांच्या घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाली आहे. या नागरिकांना तातडीची मदत सरकारन जाहीर केली आहे.

पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देणार असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले आहे. तसेच, अन्नधान्यांचे नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात येणार आहे. याविषयी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, 'प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. पुरामध्ये ज्यांची घरे वाहून गेली आहे किंवा घरात पुराचे पाणी शिरले आहे, त्या सर्व ठिकाणी सर्व कुटुंबांना दहा हजार रुपये नगदी रुपाने व पाच हजार धान्य रुपाने ही मदत देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे व मदत देणार आहोत. तसेच जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेल.' असे वडेट्टीवार म्हणाले.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, 'पूरग्रस्तांना 2019 च्या जीआर प्रमाणे मदत दिली जाणार आहे. 2019 मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आणि केंद्राचे सर्व नियम बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीसांच्या काळातील त्या जीआरप्रमाणेच राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना देण्यात येईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...