आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंत:द्राक्ष शेतीत महाराष्ट्र अग्रेसर, पण शेतकरी आत्महत्यांमुळे अस्वस्थता

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

द्राक्षशेतीत कृषी आणि विज्ञान यांचा संगम झाला आहे. आज महाराष्ट्र शास्त्रशुद्ध द्राक्ष शेतीत अग्रेसर आहे. राज्यातील प्रगतीशील शेतकरी, वैज्ञानिक, संशोधक, संस्था आणि कृषी संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे घडून आले. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्या हा अस्वस्थ करणारा मुद्दा आहे. शेतीचे अर्थकारण बिनसल्याने कर्जाचे बोजे शेतकऱ्यांवर चढते. ही परिस्थिती बदलण्यासाठी एकत्रित विचार हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी येथे केले.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर, संशोधन सल्लागार समितीचे चेअरमन डॉ. जी. एस. प्रकाश, कृषी आयुक्त धीरजकुमार, संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, संबंध देशाला मार्गदर्शक ठरेल असे काम महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने उभे केले आहे. एमआरडीबीएस ही देशातील शेतीविषयक कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये अग्रगण्य संशोधन संस्था आहे. युक्रेन -रशिया युद्धामुळे युरोप आणि रशियातील कृषी निर्यातीवर मोठा प्रभाव पडला आहे. महाराष्ट्रातील एकूण द्राक्ष उत्पादनांपैकी फक्त ८% द्राक्ष आपण निर्यात करतो. उर्वरित उत्पादन स्थानिक बाजारपेठेत जाते. सद्यस्थितीत स्थानिक बाजारपेठ मजबूत करणे ही आपल्यापुढील आव्हान आहे. द्राक्ष उत्पादकांच्या अडचणींवर राज्य सरकार, राज्य सरकारचे विभाग आणि द्राक्ष बागायतदार संघाने एकत्रित बसून मार्ग काढला पाहिजे. मर्यादित जमिनीतून अधिक उत्पादन करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीवरील भार कमी करणे गरजेचे आहे. द्राक्ष बागायतदार संघासारख्या संस्थांनी या विषयावर देखील संशोधन केले पाहिजे,’.

संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार म्हणाले, ‘ सध्या ४.५ लाख एकरावर द्राक्ष लागवड आहे. द्राक्ष निर्यातीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून भारतातून युरोपियन देशांना निर्यात होणाऱ्या द्राक्षांपैकी ९८% द्राक्षे महाराष्ट्रातून निर्यात होत आहेत. सन २०२१ मध्ये ७९६४ कंटेनर एक्स्पोर्ट झाले. यावर्षी अवेळी पाऊस, गारपीट, रशिया युद्ध यामुळे आलेल्या समस्यांमुळे ७८७४ इतके कंटेनर एक्स्पोर्ट झाले. त्याच बरोबर जागतिक बाजारपेठेमध्ये चायना मार्केट बंद झाल्याने सांगली, सोलापूर विभागात तयार होणाऱ्या लांब मण्यांच्या द्राक्षांना खुप मोठा फटका बसला आहे.

९८% द्राक्षांची महाराष्ट्रातून निर्यात {भारताच्या कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर हा १८% आहे. कोरोना काळात कृषी क्षेत्राने भारतीय अर्थव्यवस्थेला तारले. {मागील वर्षात सुमारे ७.८९ कोटी रु. पीक विमा भरपाई द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मिळाली. {नाशिक येथे क्लस्टर विकासासाठी १०० रु. तरतूद. {स्मार्ट शेती योजनेत ३०२ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या ३१७ रुपयांच्या डीपीआरला मंजुरी.

बातम्या आणखी आहेत...