आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी प्रवेश:लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश, येत्या 16 सप्टेंबरला अजित पवारांच्या उपस्थितीत बांधणार घड्याळ

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवडणूक लढवण्याची इच्छा केली होती व्यक्त

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.

मागच्या महिन्यामध्ये सुरेखा पुणेकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते. गेल्या महिन्यात त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी देखील संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. तेव्हापासूनच त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे.

निवडणूक लढवण्याची इच्छा केली होती व्यक्त
सुरेखा पुणेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा ही व्यक्त केली होती. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. यामुळे देगलूर बिलोली मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवरुन निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. आता या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...