आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Maharashtra Lockdown। Maharashtra Needs Another 15 Days Lockdown Though Decision Not Taken Yet Says Health Minister Rajesh Tope

अजून निर्णय नाही:आणखी 15 दिवसांनी वाढणार राज्यातील लॉकडाउन? आरोग्य मंत्री म्हणाले- राज्यात आणखी 15 दिवसांच्या लॉकडाउनची आवश्यकता

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कठोर निर्बंध 1 जूनपासून शिथील होणार अशी अपेक्षा असतानाच ते वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ब्रेक द चेनच्या नावाने सुरू असलेला राज्यातील लॉकडाउन आणखी 15 दिवसांनी वाढू शकतो. तसे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

राज्यात आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, असे सुतोवाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. त्यामुळे 1 जूनपासून पुन्हा 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांची संवाद साधताना हे सुतोवाच केले. राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गो स्लो गेले पाहिजे. त्यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. तसेच गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले.

काही ठिकाणी दिलासा मिळू शकतो

आरोग्य मंत्री पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना पुढे म्हणाले, लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. यानुसार सर्वच जिल्ह्यांमध्ये सरसकट लॉकडाउन वाढणार असे नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आली, त्या ठिकाणी काही निर्बंध शिथील केले जाऊ शकतात. अर्थातच काही दुकानांना सकाळी 7 ते 11 ची वेळ देण्यात आली होती. त्यात वेळ वाढवून दिला जाऊ शकतो. परंतु, रेस्टॉरंट आणि समारंभांसारख्या किंवा गर्दी होईल अशा आयोजनांना परवानगी दिली जाणार नाही. निर्बंध आणि लॉकडाउनसारखे निर्णय हे कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या बेड्स आणि इतर गोष्टींवरून घेतले जातात. लवकरच नवीन नियमावली जारी केली जाईल असे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...