आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांना नीलम गोऱ्हेंचे प्रत्युत्तर:म्हणाल्या- देवेंद्र फडणवीस यांनी कुठला बॉम्ब फोडायचा? चॉकलेटचा की शेवेचा, हे त्यांनी त्यांचे ठरवावे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असे विधान केले होते. या वक्तव्यावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दिवाळीनंतर फोडणारा बॉम्ब चॉकलेटचा आहे की शेवेचा हे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे ठरवून घ्यावे, मात्र येणारी दिवाळी ही स्वतः पण चांगली साजरी करावी, चांगले संगीत ऐकावे अशा शब्दांत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, देवेंद्रजी हे विरोधी पक्षनेते म्हणूनच नेहमी कार्यरत असतात आणि त्यांनी तेच करावे. दरम्यान, केंद्र सरकार आणि पुणे महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र त्यांनी चालवलेले हे सरकार सर्वसामान्यांसाठी घातक आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. त्यामुळे जनता येत्या निवडणुकीत शिवसेनेकडून कौल देईल आणि पोटनिवडणूक जिंकली तसेच येत्या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल अशी आशा निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले होते. "नवाब मलिक यांनी दिवाळीला लंवगी-फटाका लावला आहे. लक्षात ठेवा नवाब मलिक दिवाळी झाल्यावर बॉम्ब मी फोडेन" असा थेट इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...