आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षानंतर राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा:पुण्यात आयोजन, राज्यभरातील 2833 स्पर्धक, 18 विविध क्रीडा प्रकारात होणार सहभागी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या संकटामुळे मागील तीन वर्षापासून व राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडल्या नव्हत्या यंदा तब्बल चार वर्षानंतर राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचे 7 ते 13 जानेवारी दरम्यान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक व दोन या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत राज्यभरातील 2833 स्पर्धक 18 क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे.

11 जानेवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एसआरपीएफ येथे होणार असून 13 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप समारंभ होणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशासन अनुप सिंग उपस्थित राहणार आहे.

रितेश कुमार यांनी सांगितले की, सदर स्पर्धेच्या आयोजन करीता विविध समित्या गठित करण्यात आले आहेत. प्रत्येक समितीला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. या स्पर्धेत राज्यातील एकूण १३ घटकाचे संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धा निमित्त उपस्थित राहणारे खेळाडू व इतर पदाधिकारी अशा सव्वा तीन हजार जणांची पुणे शहरात खाजगी व शासकीय ठिकाणी निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक संघाला निवासस्थान अंतरापासून स्पर्धेच्या ठिकाणी येण्या जाण्याकरीता वाहतूक व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेनंतर 14 जानेवारी रोजी सीपीआर, पाषाण, पुणे येथे पोलीस महासंचालक बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे.

पोलिसांच्या पत्नींसाठी फायरिंग स्पर्धा

पुण्यात व राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने विविध पुरुष व महिला स्पर्धक, संघ व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी ,वरिष्ठ कार्यालयाचे प्रतिनिधी, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी पंच, रेफरी असे विविध लोक उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सदर स्पर्धेच्या निमित्ताने 13 जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिकारी यांच्या पत्नी करीता फायरिंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. छऱ्याच्या पिस्टल मधून ही स्पर्धा होणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...