आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद्यांवर संशोधनासाठी विद्यार्थ्यांना कारागृहाची दारे खुली:राज्यात होणार संशोधन, आक्षेपार्ह विषय वगळून दिली परवानगी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कारागृहातील कैद्यांवर संशोधन करण्यासाठी विद्यार्थांना राज्य कारागृह विभागाने राज्यातील कारागृहांची दारे खुली करून दिली आहेत. सामाजिक संशोधनामुळे मानवी व्यवहाराचा आणि समाजाच्या विविध पैलूंचा उहापोह होऊ शकतो. त्यामुळेच विविध विद्यापीठे, महाविदयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून बंद्यावर संशोधन करण्यासाठी कारागृहांना भेटी देण्याची परवानगी दिली असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

राज्य कारागृह विभागाचे उपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशानुसार कारागृह विभागासाठी आक्षेपार्ह असलेले विषय वगळता इतर बाबींवर संशोधन करता येणार आहे. कारागृहातील विद्यार्थ्यांच्या भेटीदरम्यान कारागृह विभागासाठी आक्षेपार्ह असलेले विषय वगळता इतर बाबींवर संशोधन करता येणार आहे. काही अटींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे.

35 विद्यार्थ्यांना परवानगी

महाविद्यालयातील जास्तीत जास्त 35 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव कारागृह भेटीची परवानगी देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच कैद्यांच्या विविध सुधारणा व पुनर्वसनाच्या उपक्रमांची माहिती मिळणार आहे. समाजकार्य विषयाच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्र भेटीमुळे शैक्षणिक अभ्यासक्रम अंतर्गत प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त हाेणार आहे. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही कारागृहातील बंद्यांच्या कायदे विषयक सहाय्य करण्यासाठी विधी व्यवसायाच्या वेळी या भेटीचा भविष्यात फायदा हाेणार आहे.

कैद्यांच्या आव्हानांवर संशोधन

या संशाेधनाद्वारे कैद्यांच्या समस्या,त्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास आदींबाबत विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था, महराष्ट्र मानसिक आराेग्य संस्था, ससून सर्वाेपचार रुग्णालय,पुणे हे देखील कैद्यांयवर संशाेधनात्मक अभ्यास करणार आहेत. महाराष्ट्रातील कैद्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर, विशेषत: भावनिक व मानसिक आराेग्याबाबत तपशीलवर संशाेधन महाराष्ट्र कारागृह विभागाच्या समन्वयाने करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...