आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Maharashtra Public Service Commission Revision Of Various Examinations, Descriptive Main Examination For Group A And Group B Cadres

परीक्षांत सुधारणा:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांत सुधारणा, गट-अ व गट-ब संवर्गाकरिता वर्णनात्मक मुख्य परीक्षा

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गांकरिता राबवण्यात येणाऱ्या विद्यमान भरती प्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरती प्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरती प्रक्रियेचे नियोजन या व इतर आनुषंगिक बाबींचा साकल्याने विचार करून आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सोमवारी सुधारणा करण्याचा आयोगाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गाकरिता यापुढे पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ व गट ब संवर्गातील पदभरतीकरिता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा (महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित एकत्रित प्राथमिक परीक्षा) या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येईल. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गाकरिता यापुढे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षेद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेकरिता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गांकरिता अर्हतेवर आधारित संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता संबंधित संवर्गासाठी (उदा. राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषिसेवा मुख्य परीक्षा इत्यादी) निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल. सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा या नावाने एकच पूर्वपरीक्षा घेण्यात येईल.

तसेच या पूर्वपरीक्षेच्या आधारे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी भरती राबवण्यात येईल.

‘गट-क मुख्य परीक्षा’ नावाने स्वतंत्र परीक्षा महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच “महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा’ या नावाने स्वतंत्र परीक्षा होईल. संयुक्त पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे सेवा गट व मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र सेवा गट-क मुख्य परीक्षा या मुख्य परीक्षांच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकरिता संबंधित संवर्गासाठी निश्चित स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येतील. अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा करीता “मराठी व इंग्रजी’ तसेच “सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी’ या पेपर्सद्वारे निवड होईल.

नवीन बदल २०२३ पासून लागू
मुख्य परीक्षेकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्धीनंतर उमेदवाराकडून भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा विकल्प घेण्यात येईल व त्याच्या आधारे संबंधित संवर्गाकरिता निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील निवडीकरिता शारीरिक चाचणी ७० गुणांची अर्हताकारी असेल. अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुण व मुलाखतीमधील गुणांच्या आधारे करण्यात येईल. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग संवर्गाच्या विद्यमान भरती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल नाही. हे बदल २०२३ मध्ये आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...