आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मै टल्ली हो गयी...':पुण्यात दारुच्या नशेत महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावर गाड्या रोखल्या; बराच वेळ ट्रॅफिक जाम

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला समजवल्यानंतर तिला कसे तरी रस्त्याच्या कडेला नेण्यात आले

पुण्याच्या स्वारगेटच्या हीराबाग चौकात एका महिलेने दारुच्या नशेत रस्त्याच्या मधोमध लोळत प्रचंड गोंधळ घातला. महिलेच्या या गोंधळामुळे जवळपास 15 मिनिटे ट्रॅफिक जाम होते. पूर्णपणे नश्यात बुडालेली ही महिला रस्त्यावर लोळत होती, ज्यामुळे लोकांना गाडी चालवताना त्रास होत होता.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेचा व्हिडिओही बनवला आणि स्वारगेट पोलिसांच्या टीमला माहिती दिली. काही वेळानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला समजवल्यानंतर तिला कसे तरी रस्त्याच्या कडेला नेण्यात आले. समोर आलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, महिला रस्त्यावर पडून वाहने थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

घटनास्थळावरून महिला फरार
या प्रकरणाचा तपास करणारे स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनार सांगतात की ही घटना मंगळवारी रात्री 10 वाजता टिळक रोडवरील हिराबाग चौकात घडली. ती महिला रस्त्यावर पडून वाहने थांबवण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही त्या महिलेला समजावत होतो, दरम्यान ती घटनास्थळावरून पळून गेली. त्यांच्या शोधासाठी एक टीम काम करत आहे. आतापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या मुलीमुळे काही वेळ घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

बातम्या आणखी आहेत...