आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणे पुन्हा वादात:केंद्रीय मंत्र्यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी, कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात लुकआउट परिपत्रक जारी केले आहे. DHFL कडून घेतलेले कर्ज न भरल्याबद्दल न्यायालयाच्या आदेशावर ही कारवाई करण्यात आली आहे.

आर्टलाइन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने 25 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. नीलम राणे आर्टलाइन प्रॉपर्टीज कंपनीच्या सह-अर्जदार आहेत. 25 कोटींचे हे कर्ज न भरल्याबद्दल लुकआउट परिपत्रक जारी केले. डीएचएफएल कंपनीने तक्रार दिल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आम्हाला केंद्राकडून कारवाईसाठी पत्र - गृहमंत्री पाटील
या प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, गृह विभागाला या संदर्भात केंद्र सरकारचे पत्र प्राप्त झाले आहे. आम्ही ते पुणे पोलिसांना दिले आहे आणि त्यानुसार आम्ही लुकआउट परिपत्रक जारी केली आहे.

सरकारची सूड घेण्याच्या भावनेने कारवाई - भाजप
या कारवाईवर भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले, 'मला सध्या याबद्दल काहीच माहिती नाही. पण जर नारायण राणे यांच्या पत्नी आणि मुलाच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली असेल तर राज्य सरकार राजकीय सूडबुद्धीने वागत आहे. ज्या बेकायदेशीर मार्गाने नारायण राणे यांना अटक करण्यात आली. राज्य सरकारची ही पुढची पायरी आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राणेंना झाली होती अटक

केंद्रीय मंत्री नारायण राणे ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थोबाडीत देण्याच्या विधानामुळे वादात सापडले होते. त्यांच्याविरुद्ध पुणे, नाशिकसह 4 शहरांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि रायगड पोलिसांनी राणेंना अटकही केली. राणेंच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उडाला. त्या प्रकरणात राणे अद्याप जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, हे परिपत्रक राणेंच्या अडचणीत भर टाकू शकते.

बातम्या आणखी आहेत...