आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Maharashtra Rains| Health Minister Rajesh Tope| Devendra Fadnavis| Maharashtra To Boost Covid19 Vaccination As State Struggles With Heavy Rain | Maharashtra Monsoon Updates

लसीकरण वाढवा:केंद्राकडे जास्त लसींची मागणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना सोबत घेऊन जाणार; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्राकडे जास्त लसींची मागणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना सोबत घेऊन जाणार; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती महाराष्ट्रात सर्वत्र पावसामुळे हाहाकार माजला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचले असून त्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात ज्या-ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती आहे, त्या-त्या ठिकाणी लसीकरण वाढवावे असे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे पुण्यात बोलत होते. सोबतच केंद्र सरकारकडे अतिरिक्त लसींची मागणी सुद्धा यावेळी बोलताना आरोग्य मंत्र्यांनी केली आहे.

फडणवीसांना दिल्लीला घेऊन जाणार आहोत
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, की "राज्यात केंद्राकडून 4 ते 5 दिवसांत कोरोनाच्या 10 लाख लस येत असतात. त्या 4-5 दिवसांत नव्हे, तर रोज मिळायला हव्या. सध्या केवळ 2-3 लाखच मिळत आहेत. आम्ही केंद्राकडे जास्त लसींची मागणी करणार आहोत. त्यासाठी आपल्या राज्यातील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही दिल्लीला घेऊन जाणार आहोत."

ज्या-ज्या ठिकाणी पूरस्थिती आहे आणि आरोग्य व्यवस्था सुरू करण्यात आल्या आहेत, त्या-त्या ठिकाणी लसीकरण करा. आरोग्य युनिट तयार करण्यात आल्या आहेत. सर्वच जण मदत करतील. हवामान विभागाकडून जशा सूचना मिळत असतात त्यानुसार नियोजन करत असतो असेही यावेळी बोलताना आरोग्य मंत्री म्हणाले आहेत.

केंद्राच्या लसी आल्यास तातडीने देतो
राजेश टोपेंनी पुढे सांगितले, की केंद्र सरकारकडून ज्या कोरोनाविरोधी लसी येतात त्या सर्वच तातडीने दिल्या जातात. केंद्राच्या धोरणाप्रमाणेच राज्यांना लसींचा पुरवठा केला जात आहे. आयसीएमआरने दिलेल्या सर्वच प्रोटोकॉलचे महाराष्ट्रात पालन केले जाते. त्यांनी दिलेल्या गाइडलाइननुसारच निर्णय घेतले जातात. त्यांनीच शाळा सुरू करा असे सांगितले तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ. यासोबतच कोण-कोणत्या भागांमध्ये शिथीलता देण्यात येणार यासाठी शिथीलता अहवाल देखील मागवले जात असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...