आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातल्या रिक्षा संघटनेत फूट:महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांची रिक्षा समितीतून हकालपट्टी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात बेकायदा बाइक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. मात्र, दुसरीकडे रिक्षा संघटनेत फूट पडल्याचे समोर आले आहे.

नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांना आंदोलन समितीतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती बघतोय रिक्षा वाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी दिली आहे.

डॉ. क्षीरसागर म्हणाले, बाबा कांबळे यांनी जाणून बुजून पत्रकार बांधवांसमोर वाद उकरून काढून आंदोलनात फूट पडेल असा प्रयत्न केला. समितीला अंधारात ठेवून परस्पर प्रादेशिक परिवहन अधिकारी व आंदोलनाशी संबंधित बाईक टॅक्सी बाबत इतर अधिकारी यांची परस्पर भेट घेऊन पारदर्शक कार्यपद्धतीच्या नियमांचा भंग केला. 28 नोव्हेंबर 2022 रोजी चक्काजाम आंदोलन सुरू झाल्यावर आंदोलनस्थळावरून मधूनच निघून गेले. आंदोलनाची कायदेशीर जवाबदारी सर्वांची सामायिक असेल हे लेखी मान्य करून सुद्धा आंदोलनानंतर गुन्हे दाखल झाल्यावर संताप करून त्याचे खापर इतरांवर फोडणे, व आंदोलनकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवले.

आंदोलनात बोलायची वेळ ठरवून दिलेली असताना दोन-दोन वेळा एक-एक तास भाषण केल्यामुळे इतर अनेकांना विशेषतः सामान्य रिक्षाचालकांना व्यक्त होण्याची संधी मिळाली नाही. आंदोलन समितीचा एकच फ्लेक्स लागेल हे ठरलेले असताना प्रादेशिक परिवहन विभाग परिसरात स्वतः चे अनेक फ्लेक्स लावून आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करणे व समिती मधील वातावरण दूषित करणे प्रयत्न केला.

आंदोलन समितीमध्ये वारंवार वैयक्तिक वाद उकरून काढून चर्चेचा स्तर खालावला.यापूर्वी अनेकवेळा समज देऊनसुद्धा सदर संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांच्या वर्तनात सुधारणा न केल्यामुळे त्यांना बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समिती मधून वगळण्याचा निर्णय समिती मधील उर्वरित सर्व 16 संघटनांनी एकमताने झालेल्या बैठकीत घेतला. त्यामुळे आता समितीत 17 ऐवजी 16 संघटना असतील.

रिक्षाचालकांच्या प्रश्नांप्रती बेशिस्त व अप्रामाणिक अशी कोणतीही कृती आंदोलन समिती खपवून घेणार नसून , चुकीचा संदेश पसरवून 12 लाख रिक्षा चालकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या या आंदोलनाला कमजोर करणाऱ्या प्रति कोणतीही हायगय केली जाणार नाही याबाबत आंदोलन समितीतील सर्व सभासद ठाम आहेत व त्यांच्यामध्ये एकजूट आहे तसेच कोणत्याही प्रकारची फूट नाही. यापुढे आंदोलन समितीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सदर संघटनेचा समावेश नसेल असे क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...